मुंबई, 1 सप्टेंबर- भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगट यांच्या मृत्यूने एकच खळबळ माजवली आहे.त्यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये सतत नवनवीन खुलासे होत आहेत. दरम्यान आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. सोनाली फोगट यांच्या शरीरावर तब्बल 46 जखमांचे व्रण आढळल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी गंभीर बनलं आहे. काही दिवसांपूर्वी हृदय विकाराच्या झटक्याने सोनाली फोगट यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली होती. परंतु त्यांच्या कुटुंबायांनी आपल्या मुलीचा घातपात झाल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांनी सीबीआय तपासाची मागणीही केली होती. त्यानंतर गोवा पोलिसांनी तपास सुरु केला होता. सध्या गोवा पोलिसांनी तपासकार्य जलद करत हरियाणा गाठलं आहे. सध्या गोवा पोलीस हरियाणात सोनाली मृत्यू प्रकरणाची धागेदोरे शोधत आहेत. तत्पूर्वी झी न्यूजच्या वृत्तानुसार, सोनाली फोगटच्या शरीरावर एक दोन नव्हे तर तब्बल 46 जखमांचे व्रण आढळून आले आहेत. त्यामुळे हे प्रकरण आणखीनच गंभीर बनलं आहे. सोनालीच्या मृत्यूनंतर भावानं गोवा पोलिसात धाव घेत धक्कादायक दावे केले होते. त्यांनी सांगितलं, ‘सोनालीचा पीए सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर यांनी मिळून माझ्या बहिणीला जाळ्यात अडकवलं. सुखविंदरने तीन वर्षांपूर्वी सोनालीच्या जेवणात अंमली पदार्थ मिसळून तिच्यावर बलात्कार केला होता आणि त्याचा व्हिडिओही बनवला होता. त्यानंतर सुधीर आणि त्याचा मित्र सुखविंदर सातत्यानं सोनालीला ब्लॅकमेल करत होते. हे दोघं अधूनमधून सोनालीच्या जेवणात विषारी पदार्थ मिसळत होते. त्यामुळे अनेकदा तिची प्रकृती बिघडली होती. शेवटी या दोघांनी मिळून कट करत गोव्यात नेऊन तिची हत्या केली’.असा खळबळजनक दावा त्याने केला होता. (हे वाचा: Sonali Phogat: सोनाली फोगाटचं होतं PA सुधीर सांगवानवर प्रेम, राखी सावंतचा मोठा खुलासा ) सोनालीच्या कुटुंबियांनी ज्या कॉम्प्युटर ऑपरेटरवर सोनालीच्या ऑफिसमधील मोबाईल, लॅपटॉप, सीसीटीव्ही आणि इतर साहित्य चोरी केल्याचा आरोप केला होता. त्या कॉम्प्युटर ऑपरेटर शिवमला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हरियाणा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याआधी पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये सोनाली फोगटचा पीए सुधीर सांगवान, मित्र सुखविंदर सिंह,ड्रग्स पेडलर, हॉटेल मालक, आणि ड्रग्स तस्कर यांचा समावेश आहे.