सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) या अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटमुळे सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे.
मराठीत आणि बॉलिवूडमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाचा झेंडा रोवणारी एक एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
सोनाली सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. तिने नुकतेच काही कमाल ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केले आहेत.
सोनाली तिच्या कामाच्या बाबतीत कायमच वेगवेगळे प्रयोग करताना दिसते. कधी दिल चाहता है सारखा एकदम हलका फुलका मस्त चित्रपट तर कधी कच्चा लिंबू सारखा गंभीर चित्रपट सगळ्या भूमिका ती चोख पार पाडते.
तेवढीच चोख ती सध्या तिच्या लुकबाबतीत सुद्धा आहे. सोनाली वेगवेगळे लूक्स try करताना दिसते. आणि त्यात ती फार सुंदर सुद्धा दिसते.
याचीच प्रचिती एका फॅनच्या कमेंटवरून येत आहे. एका फॅनने त्याला सोनालीसारखीच बायको हवीये अशी कमाल इच्छा व्यक्त केली आहे.
सोनालीच्या वर्क फ्रंटवर सांगायचं तर ती येत्या काळात ‘व्हाईट लिली अँड नाईट रायडर्स’ नाटकाच्या दौऱ्यासाठी परदेशी जाणार आहे. तसंच ती काही काळापूर्वी ती उटीमध्ये शूटिंग करून आल्याचं कळत आहे.