मुंबई, 25 जानेवारी- छोटा पडदा असो किंवा बॉलिवूड (Bollywood) सध्या सर्वत्र लग्नसराई (Wedding Season) सुरू असल्याचं दिसून येत आहे, अशातच बॉलिवूड दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) लग्नावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. लग्न कधी करणार? चाहत्याच्या या प्रश्नावर अभिनेत्रीने काय उत्तर दिले हे आपण पाहूया. बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. अभिनेत्री कोणत्याही प्रश्नावर नेहमीच बिनधास्त उत्तरे देताना दिसून येते. नुकताच सोनाक्षी सिन्हाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘आस्क मी एनिथिंग’ हा सेशन ठेवला होता. यादरम्यान चाहत्यांनी अभिनेत्रीला पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबद्दल अनेक हटके प्रश्न विचारले. सोनाक्षी सिन्हानेसुद्धा सर्वच प्रश्नांची उत्तरे आपल्या अतरंगी अंदाजात दिली आहेत. अभिनेत्रीने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये या या प्रश्न उत्तरांचे स्क्रीन शॉट्स शेअर केले आहेत. एका चाहत्याने अभिनेत्रीला विचारलं होतं, ‘या विकेंडला तुम्ही काय केला?’ यावर उत्तर देत सोनाक्षीने म्हटलं आहे, ‘मी या आठवड्यात या सोफ्यावर पडून क्रोनॉकल क्रमात मार्वल चित्रपट पुन्हा पहिली’. तर दुसऱ्या चाहत्याने प्रश्न करत अभिनेत्रीला विचारलं होतं. ‘या क्षणी तू काय करत आहेस?’ यावर उत्तर देत सोनाक्षी म्हणाली, ‘सध्या मी टीव्हीसमोर आहे मी आता पाचवा चित्रपट पाहात टीव्ही सेटचा एक व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे’. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सतत आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. या सेशन दरम्यान एका चाहत्याने अभिनेत्रीला तिच्या लग्नाबद्दलसुद्धा प्रश्न विचारून टाकला. यावेळी चाहत्याने प्रश्न करत विचारलं, ‘मॅडम सर्वांची लग्न होत आहेत. तुम्ही कधी लग्न करणार?’ यावर उत्तर देत सोनाक्षीने आपला एक हसणारा बुमरँग शेअर केला आहे. सोबतच अभिनेत्रीने लिहिलं आहे, ‘सध्या सर्वांनाच कोरोना होत आहे. मलासुद्धा कोरोना व्हायला हवा का?" अभिनेत्रीने या प्रश्नाला मजेमध्ये घेतलं. तसेच आपल्या हटके उत्तराने चाहत्यांचा मनसुद्धा जिंकलं आहे. (हे वाचा:
लिएंडरसोबत किम शर्माचं बर्थडे सेलिब्रेशन, Beach फोटो शेअर करत म्हणाली..
) आपण सोनाक्षी सिन्हाला नेहमीच पाहतो. ती प्रत्येक प्रश्नक बिनधास्त आणि अतिशय आत्मविश्वासाने उत्तरे देत असते. त्यामुळे अनेकांना ती उद्धटही वाटते. एका चाहत्याने प्रश्न विचारत तिच्या या रुड स्वभावाबद्दल विचारलं होतं. यावर उत्तर देत अभिनेत्रीने म्हंटल. ‘नाही मी खरोखरच अशी नाहीय. हा माझ्या सेन्स चा भाग आहे. माझा सेन्स ऑफ ह्युमर दाखवण्यासाठी मी असा अंदाज वापरते. पण मी अजिबात अशी नाहीय. परंतु फारच कमी लोकांना हे प्राप्त असतं.. मी त्यापैकी एक आहे.