मुंबई,2नोव्हेंबर- सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) सोमवारी अभिनेत्री हुमा कुरेशीला (Huma Qureshi) ‘कायदेशीर नोटीस’ पाठवण्याची धमकी दिली आहे. सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे ही धमकी दिली आहे. मात्र ही एक मजेदार धमकी होती. ती हुमाची थट्टा करत होती. सोनाक्षीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर हॅलोविन पोस्ट शेअर करताना हुमाला छेडलं आहे. हुमाची पोस्ट शेअर करत सोनाक्षीने लिहिलं की, “फक्त तुमच्या कौतुकासाठी माझे फोटो पोस्ट करणे थांबवा. अन्यथा मी कायदेशीर नोटीस पाठवत आहे."
हुमा कुरेशीनं इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं हातात मास्क घेतला असून चेहरा झाकलेला आहे. त्या मास्कमध्ये फक्त हुमाचे डोळे दिसतात.तिनं काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. हुमाच्या या फोटोवर इंडस्ट्रीशी संबंधित लोकांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. यात सोनाक्षी सिन्हाही सहभागी झाली होती. सोनाक्षीने कमेंटमध्ये लिहिलं की, “माफ करा, तुम्ही माझ्या परवानगीशिवाय माझे फोटो का शेअर करत आहात?तू तर जणू ते आपलेच आहेत असं शेअर करत आहेस. यासोबतच तिने तिच्या कॅप्शनमध्ये हसणाऱ्या इमोजीचाही वापर केला आहे. पोस्ट शेअर करताना हुमा कुरेशीने लिहिले, “हॅप्पी हॅलोवीन हॅशटॅग लोल फोटो, एस्टरडे नाईट, हॅशटॅग सोहो.” हुमाचा भाऊ, अभिनेता साकिब सलीम याने सोनाक्षीच्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली. त्याने लिहिलं , “सोनाक्षी हाहाहाहा इथेही फसवणूक होत आहे.” त्यावर सोनाक्षी म्हणाली, “साकिब तिला लोकांनी सांगावं की ती सुंदर आहे म्हणून ती आता माझे फोटो वापरत आहे. कृपया हे समजून घ्या.“हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा या फार चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या अनेकवेळा एकत्र दिसून येतात. दोघीही अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सतत त्या आपल्या दैनंदिन पोस्ट शेअर करून चाहत्यांना आपल्या अपडेट्स देत असतात. (हे वाचा: HBD: इतक्या पैशांमध्ये न्यूड सीन देशील का?करणच्या प्रश्नावर असं होतं शाहरुखचं ) वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, हुमा कुरेशी शेवटची अक्षय कुमार, लारा दत्ता, वाणी कपूर आणि आदिल हुसैन स्टारर ‘बेलबॉटम’ मध्ये दिसली होती. निर्माता बोनी कपूर यांच्या आगामी ‘वलीमाई’ या चित्रपटात ती दिसणार आहे. यात अजित कुमार आणि कार्तिकेय गुम्माकोंडा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर दुसरीकडे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाबद्दल सांगायचं झालं तर, ती हॉरर-कॉमेडी ‘काकुडा’ मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये रितेश देशमुख आणि साकिब सलीम यांच्याही भूमिका आहेत. अजय देवगण आणि संजय दत्तसोबत ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’मध्ये ती शेवटची दिसली होती. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित झाला.