JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / "मी तुमची पॉवर काढून घेतली", Twitter Exit नंतर सोनाक्षी सिन्हाचं ट्रोलर्सना उत्तर

"मी तुमची पॉवर काढून घेतली", Twitter Exit नंतर सोनाक्षी सिन्हाचं ट्रोलर्सना उत्तर

ट्विटर एक्झिटनंतर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (sonakshi sinha) प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 जून :  अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant sing rajput) आत्महत्येनंतर बॉलीवूड नेपोटिझमवरून अनेक बॉलीवूड कलाकार सोशल मीडियावर ट्रोल झाले. करण जोहरसह विशेषत: स्टार कि़ड्सना टार्गेट करण्यात आलं. अभिनेत्री आलिया भट्टप्रमाणे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावरही (sonakshi sinha) ट्रोलर्सनी निशाणा साधला. विशेष म्हणजे सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूड हल्लाबोल करण्यात आला आणि यावर सोनाक्षीने ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली. त्यानंतर नेटिझन्सनी तिलाही ट्रोल केलं आणि यानंतर सोनाक्षीने ट्विटरवरूनच पळ काढला. तिने ट्विटरला अलविदा केलं. आपण ट्विटर का सोडत आहोत याची शेवटची पोस्ट तिने ट्विटरवर केली होती, ज्याचा स्क्रिनशॉट तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकला होता. आता तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला व्हिडीओ शेअर केला आहे आणि भली मोठी पोस्ट लिहिली आहे. “मी तुमची पॉवर काढून घेतली आहे. इथं विजेता फक्त एकच असतो आणि ती मी आहे”, असं तिनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सोनाक्षी म्हणाली, “काही लोकांना वाटत असेल ते जिंकले आणि त्याचा त्यांना उत्साह वाटत असेल. मी तुमच्यासाठी आनंदी. तुम्हाला वाटतं ना, मग तसं वाटू द्या. कुणालाही काही फरक पडत नाही” हे वाचा -  एकाच वेळी दोन्ही हातांनी लिहिण्याची कला; मल्टी टॅलेंटेड सुशांतचा आणखी एक VIDEO “माझ्या आयुष्यात लुडबूड करण्याचा तुमचा डायरेक्ट सोर्स मी कापला आहे. माझ्याबाबत, माझ्या कुटुंबाबाबत आणि माझ्या मित्रपरिवाराविरोधात काहीही बोलण्याची तुमची पॉवर मी काढून घेतली आहे. तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला मी ही पॉवर दिली होती. मग काय विजेता हा एकच असतो आणि इथे विजेती मी आहे”, असं ती म्हणाली. संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या