मुंबई, 4 सप्टेंबर- नेटफ्लिक्स शो ‘फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाइव्हज’ चा दुसरा सीजन शुक्रवारपासून सुरु झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चाहत्यांना गॉसिप आणि ग्लॅमरचा तडका पाहायला मिळणार आहे. या सीजनमध्ये इंडियन मॅचमेकिंगच्या सीमा टापारिया सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी सोहेल खानची एक्स पत्नी सीमा सजदेहला त्यांच्या घटस्फोटाबाबत विचारलं असता, सीमाने पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर या गोष्टीचा खुलासा केला आहे. या शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये ‘इंडियन मॅचमेकिंग’ शोच्या होस्ट आणि सीमा आंटी फेम सीमा टपारीया सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी सीमासोबत तिच्या खाजगी आयुष्याबाबतही संवाद साधला. दरम्यान अभिनेता संजय कपूरची पत्नी महिप कपूरने सीमासाठी योग्य जोडीदार शोधण्याची मागणी सीमा आंटीजवळ केली होती. यावर सीमा आंटीने प्रश्न विचारत, सीमाला सोहेलसोबतचं नातं संपुष्ठात का आलं? याबाबत विचारलं. यावर पटकन उत्तर देत सीमाने म्हटलं, ‘कदाचित मला मुलींमध्ये इंटरेस्ट आहे म्हणून’.सीमाचं हे उत्तर ऐकून सर्वच थक्क झाले होते. परंतु नंतर सीमा आपण मस्करी करत असल्याचं सांगते. त्यानंतर आपल्या घटस्फोटाचं खरं कारण सांगताना सीमा म्हणते, ‘आमच्या विचारात फारच अंतर होतं. आमचे विचार अजिबात पटत नव्हते. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही विभक्त राहत असल्याचंही सीमाने सांगितलं. तसेच आपला लहान मुलगा हे सर्व समजून घेण्यासाठी फारच लहान असल्याचं सीमाने सांगितलं. तर आपला मोठा मुलगा निर्वाण आमच्या निर्णयाशी सहमत असल्याचं ती म्हणाली. परंतु घरावरील नेमप्लेट मधून खान आडनाव हटवल्याने आपला मोठा मुलगा आपल्यावर नाराज झाल्याचंही ती सांगते. **(हे वाचा:** Seema Sajdeh: सोहेल खानच्या X-पत्नीला मुलं नव्हे तर मुलींमध्ये इंट्रेस्ट, सीमाने केला मोठा खुलासा ) सीमा सजदेह आणि सोहेल खान यांनी 1998 मध्ये लव्ह मॅरेज केलं होतं. सीमाला 2000 मध्ये मोठा मुलगा निर्वाणला जन्म दिला होता. तर जून 2011 मध्ये सरोगसीद्वारे त्यांचा दुसरा मुलगा योहानचा जन्म झाला आहे.लग्नाच्या तब्बल 22 वर्षानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला आहे.