उदित नारायण
मुंबई, 6 ऑक्टोबर : बॉलिवूडचे लोकप्रिय गायक उदित नारायण यांच्याविषयी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची बातमी सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या बातमीमुळे उदित नारायण यांच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला. अशातच या बातमीविषयी सत्य समोर आलं आहे. हृदय विकाराचा झटका आल्याची बातमी समोर आल्यापासून उदित नारायण यांच्या प्रकृतीविषयी अनेकजण चिंतेत होते. त्यांना मेसेज करुन प्रकृतिविषयी विचारपूस करत होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्या खोट्या असून याविषयी त्यांच्या मॅनेजरने माहिती दिली आहे.
उदित नारायण यांच्या मॅनेजरने सांगितलं की, अचानक ही बातमी कुठून पसरू लागली आहे. या बातम्यांनंतर सतत फोन आणि मेसेज येत आहेत. ट्विटरवर व्हायरल होत असलेला मेसेज पाहून मी काल रात्री उदितजींशीही बोललो. तेही खूप अस्वस्थ झाले होते. मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, ही अफवा नेपाळच्या दिशेने पसरवण्यात आली आहे. ज्या क्रमांकावरून हा मेसेज पसरवला जात आहे तो नेपाळचा असल्याचं त्यांचं मत आहे.
दरम्यान, जेव्हा गायकाच्या हृदयविकाराचा झटका आल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा सगळेच चक्रावून गेले. एवढ्या तंदुरुस्त गायकाला अचानक हृदयविकाराचा झटका कसा काय आला यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. या बातमीने खुद्द उदित नारायणही थक्क झाले. मात्र आता ते ठीक असल्याचा दिलासा चाहत्यांना मिळाला त्यामुळे ते या बातमीने चाहते आता आनंदी आहेत.