JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / घटस्फोटानंतर हनी सिंह 'या' अभिनेत्रीला करतोय डेट?, यामुळे मिळाली हिंट

घटस्फोटानंतर हनी सिंह 'या' अभिनेत्रीला करतोय डेट?, यामुळे मिळाली हिंट

प्रसिद्ध रॅपर आणि गायक हनी सिंह कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच हनी सिंहचा घटस्फोट झाला. यामुळे तो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला होता.

जाहिरात

हनी सिंह

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 ऑक्टोबर : प्रसिद्ध रॅपर आणि गायक हनी सिंह कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच हनी सिंहचा घटस्फोट झाला. यामुळे तो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला होता. हनी सिंह त्याच्या लव्ह लाईफमुळेही अनेकदा चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच हनी सिंगचा घटस्फोट झाला आणि आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला असून त्याच्यासोबत पुन्हा एकदा एका नव्या तरुणीचं नाव जोडलं जात आहे. काही दिवसांपूर्वी हनी सिंगने त्याच्या बेटर हाफसोबतचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हनी सिंहने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या नव्या बेटर हाफचा हात दिसत आहे. मंगळवारी हनी सिंहने दोन हातांचा क्लोज-अप शॉट शेअर केला. यामध्ये त्यानं तिचा चेहरा दाखवला नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याची बेटर हाफ नक्की कोण आहे? प्रश्न पडला होता. आता ती मॉडेल आणि अभिनेत्री टीना थडानी असल्याचे सोशल मीडिया यूजर्सचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या

हनी सिंहने शेअर केलेल्या फोटोत मॉडेल आणि अभिनेत्रीने एक ब्रेसलेट घातलेलं दिसत आहे. सेम ब्रेसलेट हातात घालून टीनाचे अलीकडेच फोटो शेअर केला होता. त्यामुळे नेटकऱ्यांना ते दोघे डेट करत असल्याचं वाटत आहे. हनी किंवा टीना दोघांनीही या अफवांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, हनी सिंहची पत्नी शालिनी तलवारने हनी सिंहवर शारीरिक हिंसा, लैंगिक हिंसा, मानसिक छळ आणि आर्थिक हिंसाचाराचे आरोप केले होते. शालिनी तलवारने हनी सिंहबद्दल अनेक मोठे खुलासे करत त्याच्या कुटुंबावरही अनेक आरोप केले होते. हनी सिंहवर फसवणूक केल्याचा आरोपही केला होता. हनी सिंहचे इतर महिलांसोबतही संबंध असल्याचा खुलासाही तिनं दाखल केलेल्या याचिकेत केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या