श्रेया बुगडे (Shreya Bugde) या अभिनेत्रीचं घर तिच्याइतकंच सुंदर आहे. या घराचे काही खास फोटो पाहा.
श्रेयाच्या अभिनयाबद्दल, तिच्या प्रत्येक पात्रातील सहजतेबद्दल आजवर अनेकदा बोललं गेलं आहे पण या अभिनेत्रीच्या एका वेगळ्या पैलूबद्दल आज जाणून घेऊया.
श्रेयाच्या अभिनयाइतकंच सुंदर तिचं घरसुद्धा आहे. तिच्या घरात विविध प्रकारच्या वस्तू आहेत ज्याचा उपयोग तिने घर सजवण्यासाठी केला आहे.
तिचं घर सुंदर पद्धतीने सजवलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेम, दिवे, मूर्त्या अशा अनेक होम डेकोरच्या गोष्टी तिच्या घरात पाहायला मिळतात.
श्रेयाने अगदी मनापासून हे घर सजवल्याचं आणि इंटिरियर पासून प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष देऊन मेहनत घेतल्याचं दिसून येत आहे.
विशेष करून तिच्या बाल्कनी व्ह्यू च्या फोटोवर अनेकांनी तिचं खूप कौतुक केलं आहे. तिच्या बाल्कनीतून दिसणारा सुंदर नजारा आणि त्यासोबत वाफाळता चहा असं मस्त कॉम्बिनेशन अनेक फोटोमध्ये दिसून आलं आहे.
तिच्या घराचे हे फोटो खूप viral सुद्धा होतात आणि चाहते आपुलकीने त्यावर सुंदर कमेंट सुद्धा करताना दिसतात.