मुंबई, 8 फेब्रुवारी- ज्येष्ठ गायिका आणि भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनाने संपूर्ण देश दुःखात आहे. सोशल मीडियावरून सतत त्यांना आदरांजली दिली जात आहे. सर्वसामान्य लोकांपासून ते मनोरंजनसृष्टीतील कलाकारांपर्यंत सर्वजण दीदींच्या आठवणीत बुडाला आहे. राजकीय नेत्यांपासून अनेक कलाकार दीदींना शेवटचा निरोप देण्यासाठी पोहोचले होते. यामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूरचादेखील (Shraddha Kapoor) समावेश होता. श्रद्धा मंगेशकर कुटुंबासोबतच दिसून येत होती. कारण श्रद्धा आणि लता दीदींमध्ये एक खास नातं होतं. आज अभिनेत्रीने दीदींसोबतचे काही जुने फोटो शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर अनेकवेळा लता दीदींच्या कुटुंबासोबत दिसून आली आहे. अनेकवेळा श्रद्धा दीदींना भेटण्यासाठीसुद्धा गेलेलं आपण पाहिलं आहे. दीदी या इतरांप्रमाणे श्रद्धासाठीसुद्धा प्रेरणास्थान होत्या. श्रद्धा नेहमीच त्यांना आपला आदर्श मानत होती. महत्वाचं म्हणजे श्रद्धा आणि दीदी यांच्यात एक खास नातं होतं. ते नातं काय होतं हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागली आहे. खरं तर श्रद्धा लता दीदींना आजी म्हणून बोलावत होती. त्यामुळे हे नातं नेमकं कसं? याबद्दल अनेकांना जाणून घ्यायचं आहे. दीदी श्रद्धाच्या आजी कशा?- लता दीदी श्रद्धाला आजी कशा लागत? याबद्दल सर्वांना उत्सुकता वाटते. तर याबद्दल आपण पाहूया. श्रद्धा कपूरचे आजोबा अर्थातच तिच्या आईचे वडील पंढरीनाथ कोल्हापुरे हे होते. ते सुद्धा एक उत्कृष्ट गायक आणि वीणावादक होते. पंढरीनाथ हे लता दीदींचे चुलत भाऊ होते. आणि म्हणूनच आपल्या आजोबांची बहीण या नात्याने दीदी श्रद्धाच्या आजी लागत असत. श्रद्धा काही खास क्षणी दीदींसोबत दिसून आली आहे. त्यांचे कौटुंबिक संबंध चांगले होते. श्रद्धा कपूरची इंस्टाग्राम पोस्ट- अभिनेत्री श्रद्धा कपूरने आज लता दीदींच्या आठवणीत एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट फारच खास आहे. कारण पायामध्ये अभिनेत्रीने लता दीदींसोबतचे काही सुंदर जुने फोटो शेअर केले आहेत.सोबतच दीदींच्या आठवणीत एक भावुक पोस्टही लिहिली आहे.
लता मंगेशकर गेली 28 दिवस मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होत्या. यादरम्यान त्यांना अनेकदा जनरल वॉर्ड आणि आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी त्यांना आयसीयूमधून बाहेर काढण्यात आलं होतं. परंतु आदल्या दिवशी त्यांची प्रकृती चिंताजनक वाटू लागल्यानं त्यांना पुन्हा लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं होतं.परंतु त्यांची ही झुंज अपयशी ठर