Shraddha arya Honeymoon Photos : अभिनेत्री श्रद्धा आर्या तिच्या पतीसोबत मालदीवमध्ये हनीमून एन्जॉय करत आहे. तिथून ती तिचे अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत आहे.
आपल्या अभिनयामुळे टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य करणारी अभिनेत्री श्रद्धा आर्या हिने काही दिवसांपूर्वीच दिल्लीस्थित नौदल अधिकारी राहुल नागलसोबत लग्न केलं असून आता ती आपल्या पतीसोबत मालदीवमध्ये हनिमून एन्जॉय करत आहे. त्याचे अनेक फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
कुंडली भाग्य या टीव्ही मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री श्रद्धा आर्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये पोझ देताना दिसत आहे.
फोटोंमध्ये श्रद्धा खूपच बोल्ड दिसत आहे. तिची ही बोल्ड स्टाइल चाहत्यांना फार आवडलेली आहे. या फोटोंबरोबर तिनं श्रद्धाने एक क्यूट कॅप्शनही लिहिलं आहे.
फोटो शेअर करताना श्रद्धा आर्यने कॅप्शन लिहिलंय की, 'शेवटच्या फोटोवर स्वाइप करा आणि पाहा माझ्या पतीने माझ्या पोझची कशी खिल्ली उडवली.' लाइफ आफ्टर मॅरेज असा हॅश टॅगही त्यांनी दिला आहे.
श्रद्धाने सांगितल्याप्रमाणे शेवटच्या फोटोत तिच्या नवऱ्याने अशी पोझ दिली आहे. तिच्या फोटो पोझची त्याने खिल्ली उडवली आहे.
श्रद्धा आर्यने साऊथ चित्रपट आणि टीव्ही मालिकांसह बॉलिवूडमध्येही काम केले आहे. यामध्ये तिने अमिताभ बच्चन यांच्या 'निशब्द' चित्रपटातही काम केले आहे. यामध्ये तिने रितूची भूमिका साकारली होती.
याशिवाय श्रद्धाने शाहिद कपूर आणि आयशा टाकिया स्टारर 'Paathshaala' या चित्रपटातही काम केलेलं आहे.
श्रद्धा आर्या नेहमी सोशल मीडियात आपल्या फोटोंमुळं चर्चेत असते. आता तिनं शेयर केलेल्या या फोटोंची चाहत्यांमध्ये फार चर्चा होत आहे.