JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / इटलीतील PM पदाच्या महिला उमेदवाराने थेट बलात्काराचा Video पोस्ट केला अन्..

इटलीतील PM पदाच्या महिला उमेदवाराने थेट बलात्काराचा Video पोस्ट केला अन्..

पुढील पंतप्रधान निवडण्यासाठी इटलीमध्ये निवडणुका होत आहेत. या निवडणुकीदरम्यान पंतप्रधानपदाच्या उमेदवार जॉर्जिया मेलोनी यांनी बलात्काराचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रोम, 24 ऑगस्ट : निवडणूक (Election) म्हटलं की प्रचार, आरोप-प्रत्यारोप आदी गोष्टी पाहायला मिळतात. निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवार (Candidate) सर्वतोपरी प्रयत्न करतो. काही वेळा निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवारांनी गैरमार्गाचाही वापर केल्याचं दिसून आलेलं आहे. एकूणच निवडणुकीत विजयी होण्यासाठी एखादा उमेदवार कोणत्याही थराला जाऊ शकतो. परंतु, पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत एखाद्या उमेदवारानं गैरकृत्य केलं तर त्याला नेमकं काय म्हणायचं हा प्रश्न पडतो. इटलीमध्ये (Italy) सध्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरू आहे. प्रचारादरम्यान आरोप -प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. मात्र पंतप्रधानपदाच्या प्रमुख उमेदवारांपैकी एक असलेल्या जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी या निवडणुकीत विजयी होण्याच्या उद्देशानं सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ बलात्काराचा (Rape) आहे. ``न्यायासाठी मला मतदान करावं,`` असं आवाहन जॉर्जिया मेलोनी यांनी या माध्यमातून नागरिकांना केलं आहे. या कृतीमुळे मेलोनी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. `टाइम्स नाउ डिजिटल`ने या विषयीचं वृत्त दिलं आहे. इटलीमध्ये सध्या पंतप्रधानपदासाठी (Prime Minister) निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. प्रत्येक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे. अशातच पंतप्रधानपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवार जॉर्जिया मेलोनी यांनी मतांसाठी बलात्काराशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्या नागरिकांकडे मतं मागत आहे. मेलोनी यांच्या या कृतीवर विरोधी पक्षाने (Opposition Parties) संताप व्यक्त केला असून, जोरदार टीका देखील केली आहे. वाचा - ब्रिटिश महिलांची वेश्याव्यवसायात येण्याची टक्केवारी वाढली, धक्कादायक कारण समोर इटलीच्या उत्तरेकडील पियासेंजा या शहरातील स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ``55 वर्षाची एक युक्रेनियन महिला इटलीत निर्वासित म्हणून राहत आहे. तिच्यासोबत बलात्काराची घटना घडल्याचं समोर आलं आहे. एका कृष्णवर्णीय व्यक्तीवर बलात्काराचा आरोप आहे.`` या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ मेलोनी यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी त्याचा राजकीय हेतूने वापर करत, तो ट्विटरवर (Twitter) पोस्ट केला आहे. मेलोनी हा व्हिडिओ ब्लर (Blur) न करताच ट्विटरवर पोस्ट केला. ``भरदिवसा महिलेवर बलात्कार होतोय. हे कसं सहन करायचं. मी पंतप्रधान झाले तर कायदा अधिक कडक केला जाईल,`` असं त्यांनी म्हटलं आहे. मेलोनी यांनी हा व्हिडिओ पोस्ट करताच, या कृत्यामुळे त्यांचे विरोधक संतापले. ``निवडणूक जिंकण्यासाठी त्या अशा घृणास्पद डावपेचांचा अवलंब करत आहेत. या घृणास्पद कृत्यासाठी इटलीची जनता त्यांना कधीच माफ करणार नाही,`` असं विरोधी पक्षानं म्हटलं आहे. या व्हिडिओविषयी माहिती मिळताच ट्विटरने आपल्या प्लॅटफॉर्मवरून हा व्हिडिओ काढून टाकला आहे. जॉर्जिया मेलोनी या इटलीतील प्रसिद्ध नेत्या आहेत. त्या उजव्या विचारसरणीच्या उमेदवार असून, पंतप्रधानपदाच्या प्रबळ दावेदारही आहेत. महिला असल्याने राजकारणात त्यांना एक वेगळा दर्जा आहे. पण आता या कृतीमुळे त्या बॅकफूटवर गेल्याचं दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या