मुंबई,19ऑक्टोबर- बिग बॉस 15 (Bigg Boss 15) मध्ये या वीकेंडला कोणीही घरातून बेदखल झालं नव्हतं. त्यामुळे स्पर्धकांसोबत त्यांचे चाहतेही खूप आनंदी होते. पण बिग बॉस हा संपूर्ण अनिश्चिततेचा खेळ आहे. मेकर्स या शोमध्ये कधीही ट्विस्ट(Big Tweest) आणतात आणि पुन्हा एकदा असंच काहीसं घडलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस’च्या घरात डबल इव्हिक्शन बॉम्बचा धमाका झाला आहे. ‘बिग बॉस’ वेळोवेळी कुटुंबातील सदस्यांना धक्का देत राहतात. आणि पुन्हा एकदा असंच झालं आहे.
खरं तर, घडलं असं की, घरातील सदस्य ‘बिग बॉस’ घराचे काही नियम मोडतात, त्यानंतर ‘बिग बॉस’ घरातल्या प्रत्येक सदस्यला शिक्षा करतो. पहिली शिक्षा म्हणजे प्रत्येक स्पर्धकाला जंगलात परत जावं लागतं. दुसरी शिक्षा कोणत्याही दोन स्पर्धकांना परस्पर संमतीने बाहेर काढणे आणि तिसरी शिक्षा म्हणून नवीन कॅप्टन निशांत भट्टला 8 नावे दिली जातात ज्यांना थेट नामांकित केले जाईल. हे ऐकून सर्व स्पर्धकांना धक्का बसला आहे. बिग बॉस कुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांचे मत विचारतात आणि त्यांना दोन लोकांची नावे देण्यास सांगितलं जातं. अशाप्रकारे, कुटुंबातील सदस्य डोनल बिष्ट आणि विधी पंड्या यांना बाहेरचा मार्ग दाखवतात. ट्विटर हँडल द खबरीनुसार, विधी पंड्या आणि डोनाल बिष्ट यांना कुटुंबातील सदस्यांच्या मतदानानंतर शोमधून बाहेर काढण्यात आलं आहे.डोनाल बिष्ट आणि विधी पंड्या हे घरातील एक मजबूत खेळाडू होते.बाहेरही त्यांची चांगली फॅन फॉलोइंग आहे. अशा स्थितीत डोनाल बिष्ट आणि विधी पांड्याच्या चाहत्यांसाठीही हे सर्व धक्कादायक आहे. (**हे वाचा:** Bigg Boss15: कॅप्टन्सी टास्कदरम्यान जय-प्रतीकमध्ये तुफान राडा; तर निशांतने मारली ) ‘द खबरी’ या ट्विटर हँडलच्या या ट्विटनंतर घराबाहेरचे चाहतेही हैराण झाले आहेत. त्यांना विश्वासच बसत नाही की शोच्या सुरुवातीच्या टप्प्यातच बिग बॉसने घरात असा धमाका केला आहे. त्याचबरोबर कॅप्टन निशांत भट्टने नॉमिनेट केलेल्या 8 जणांमध्ये ईशान सहगल, मायशा अय्यर, सिम्बा नागपाल, अफसाना खान, उमर रियाज, करण कुंद्रा, शमिता शेट आणि विशाल कोटीयन यांचा समावेश आहे.