मुंबई, 29 ऑगस्ट: बॉलिवूडमधील स्टार्स हे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. अगदी क्षुल्लक कारणावरूनही ते प्रकाश झोतात येत असतात. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलं म्हणजेच स्टार किड्सही प्रचंड चचेचा विषय ठरतात.अशातच आपल्या फिटनेसमुळे सगळ्यांना थक्क करणारी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या मुलाची चर्चा सोशल मीडियावर रंगलीये. यामागील कारणही काही खासच आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा मुलगा विआन राज वयाच्या 10 व्या वर्षी बिझनेसमॅन बनला आहे. इतक्या कमी वयात विआननं व्यवसाय सुरु केल्याचं ऐकून अनेकांना धक्काच बसला आहे. पण ही गोष्ट खरी असून ही आनंदाची बातमी शिल्पा शेट्टीनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधलं आहे. हेही वाचा - ‘मला गोमांस खायला आवडतं’; Boycott Brahmastra दरम्यान रणबीरचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत शिल्पानं व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, ‘माझा मुलगा विआन राज त्याचा पहिलाच आणि वेगळा असा व्यवयाय सुरु करत आहे. याचं नाव @vrkickss असून हे कस्टमाइज स्नीकर्स बनवतात. लहान मुलांच्या मोठ्या स्वप्नांना नेहमीच प्रोत्साहन दिलं पाहिजे. व्यवसायाच्या संकल्पनेपासून डिझाईन, आणि अगदी व्हिडीओपर्यंत हे सगळं विहानने केलंय. या व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईतून तो काही पैसे चॅरीटीमध्ये देणार आहे’. याने मलाही आश्चर्यचकित केलं असल्याचं यावेळी शिल्पानं म्हटलं आहे. शिल्पानं तिच्या मुलाला या व्यवसायासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
शिल्पानं शेअर केलेल्या पोस्टवर कलाकारांपासून चाहत्यांपर्यंत सगळेच त्याच्यावर प्राऊड फील करत आहेत. सगळेजण त्याला त्याच्या नव्या व्यवसायासाठी शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. विहानमधील आत्मविश्वासाचंही सगळेच कौतुक करत आहे. सध्या सोशल मीडियावर शिल्पाचा मुलगा विआन राजचा व्हिडीओ झपाट्यानं व्हायरल होत असून अनेकजण कमी वयात केलेल्या या कामगिरीविषयी आनंद व्यक्त करत आहेत. दरम्यान, शिल्पा शेट्टी. 47 व्या वर्षीही शिल्पा स्वतःला एकदम फिट ठेवते. ती नेहमीच चाहत्यांना योगासनांचे वेगवेगळे फोटो, व्हिडीओ शेअर करत फिटनेस मंत्रा देताना दिसते. तिच्या फिटनेसचे अनेक चाहते असून तिच्यापासून अनेकजण प्रेरणा घेताना दिसतात.