मुंबई, 02 नोव्हेंबर: पोर्नोग्राफीच्या केसमध्ये तुरुंगात जाण्याआधी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) नवरा आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) सोशल मीडियावर बराच ॲक्टिव्ह असायचा. शिल्पासोबतचे अनेक मजेशीर व्हिडिओजही त्यानं बऱ्याचदा शेअर केले होते; मात्र पोर्नोग्राफी केसमध्ये नाव आल्यानंतर राज कुंद्राचं आयुष्यच बदलून गेलं आहे. दोन महिने जेलमध्ये राहिल्यानंतर राज बाहेर आला खरा; पण अजूनही त्यानं पब्लिक अपिअरन्स दिलेला नाही म्हणजेच तो कुठेही माध्यमांच्या नजरेस पडलेला नाही. याबाबतचं वृत्त ‘टीव्ही 9 हिंदी’ ने दिलं आहे. राज कुंद्राला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. आपल्याला बळीचा बकरा बनवण्यात आल्याचा आरोप राजनं त्याच्या अर्जात केला आहे. ॲडल्ट कंटेट बनवत असल्याची जी तक्रार आपल्याविरोधात करण्यात आली आहे त्याबाबत कोणताही पुरावा नसल्याचा राजचा दावा आहे. व्हिडिओ शूटिंगमध्ये आपण सहभागी असल्याची कोणतीही तक्रार आरोपपत्रात दाखल नसल्याचं राजचं म्हणणं आहे. तसंच एफआयआरमध्येही (FIR) आपलं नाव नव्हतं; मात्र पोलिसांनी आपल्याला जबरदस्तीनं या केसमध्ये खेचल्याचा राजचा दावा आहे. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राजनं इन्स्टाग्राम, ट्विटर अशा सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरची आपली अकाउंट्स (Social Media Account) डिलीट केली आहेत. आता राजनं अचानक असं का केलं, याबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही; मात्र आतापर्यंत राजनं शिल्पाबरोबरचा एकही फोटो शेअर केलेला नाही. नुकतंच शिल्पानं करवा चौथचं व्रतही केलं होतं. दर वर्षी करवा चौथला ती राजबरोबर आपला फोटो सोशल मीडियावर शेअर करत असे. या फोटोवर चाहत्यांच्या लाइक्सचा पाऊस पडायचा. या वर्षी मात्र तिनं एकटीचाच फोटो शेअर केला होता. त्यानंतर शिल्पा तिच्या दोन्ही मुलांबरोबर अलिबागला जातानाही मीडियानं टिपलं होतं; पण त्याही वेळेस राज तिच्याबरोबर नव्हता. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. काटा किर्र्रर्रर्र! रायाचा नवा LOOK होतोय VIRAL; ‘मन झालं बाजिंद’मध्ये….. राज कुंद्राला जामीन मिळण्यापूर्वी शिल्पा वैष्णौदेवीच्या मंदिरात गेली होती. राज जेलमधून बाहेर आल्यानंतर लगेचच काही दिवसांनी शिल्पानं नवीन हेअरकट केला आहे. शिल्पाचा हा हेअरकट एकदम वेगळा होता. तिनं मागच्या बाजूनं अर्धेच केस कापले होते. शिल्पानं तिच्या हेअरकटचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरही शेअर केला होता. हा व्हिडिओही भरपूर व्हायरल झाला होता. राज जेलमधून बाहेर यावा यासाठीच शिल्पा नवस बोलली होती, त्यामुळे तिनं केस कापले असं, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बोललं जात आहे. आता यात खरं काय आणि खोटं काय हे फक्त शिल्पाच सांगू शकते. शिल्पाच्या प्रोफेशनल लाइफबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती हंगामा 2 (Hungama 2) या चित्रपटात शेवटची दिसली होती. या फिल्ममधून शिल्पानं मोठ्या पडद्यावर 14 वर्षांनी कमबॅक केलं होतं. आता शिल्पा निकम्मा (Nikamma) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिमन्यू दसानी आणि शर्ली सेतीया मुख्य भूमिकेत आहेत.