Shashank ketkar
मुंबई 25 ऑगस्ट : सध्या मराठी कलाकारांच्या परदेशवाऱ्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. हे कलाकार प्रदेशात चित्रपटाचे शूटिंग किंवा नाटकाच्या निमित्ताने जात आहेत. हे मराठी कलाकार एकाच वेळी मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करण्याची कसरत करत आहेत. मराठीतील प्रसिद्ध कलाकार शशांक केतकर सध्या ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. पण त्याने सध्या मालिकेतून ब्रेक घेतलेला पाहायला मिळतोय. शशांक सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेला आहे. तो ‘आमनेसामने’ या नाटकाच्या प्रयोगासाठी तो सध्या अमेरिकेत गेला आहे. पण त्याची स्टार प्रवाहावरील ‘मुरांबा’ ही मालिकासुद्धा बरीच गाजते आहे. शशांक मालिकेत न दिसल्याने चाहत्यांची चिंता वाढली होती. पण आता मुरांबा मालिकेच्या प्रेक्षकांना एक छान सरप्राईज पाहायला मिळणार आहे. शशांक नाटकासाठी प्रदेशात गेला असला तरी तो मालिकेमध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे. हा कलाकार मालिकेतून ब्रेक न घेता अमेरिकेतून मालिकेचं शूटिंग करताना पाहायला मिळणार आहे. मुरांबा मालिकेत अक्षय आणि रमाची जोडी आता चांगली जमली आहे. या दोघांच्या प्रेमाचा मुरांबा चांगलाच मूरत आहे. आता शशांकला अमेरिकेत जावे लागले. त्याप्रमाणे मालिकेच्या कथानकात बदल केला गेला आहे. मालिकेचा एक नवीन प्रोमो सध्या प्रदर्शित झाला आहे. त्या प्रोमोनुसार अक्षय आणि रमा एकमेकांपासून दूर आहेत, पण एकमेकांना मिस करत आहेत. रमाला अक्षय अमेरिकेत जाऊन तिला विसरणार तर नाही ना अशी चिंता सतावत आहे. पण अक्षयसुद्धा अमेरिकेत रमाला मिस करत असल्याचं पाहायला मिळत आहे. हेही वाचा - Hruta Durgule : ‘अनन्याच्या कौतुकात लोकांनी आखडता हात घेतला’; असं का म्हणाली हृता? याआधीही काही मालिकांमध्ये परदेशात शूटिंग करण्यात आलेलं आहे. झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत नेहा म्हणजेच प्रार्थना बेहेरे इतर कामासाठी लंडनला गेली होती. तेव्हा तिने लंडनमधून मालिकेचं शूटिंग केलं होतं. आता त्याप्रमाणेच मुरांबा मालिकेतसुद्धा दाखवण्यात येणार आहे. चाहते त्यांच्या लाडक्या अक्षयला अमेरिकेतून पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
शशांक केतकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सध्या अमेरिकेतील फोटो शेअर करत आहे. तो रसिक सुनील या अभिनेत्रींसोबत अमेरिकेत आमने सामने या नाटकाचा प्रयोग करणार आहे. शशांकने नुकताच एक व्हिडिओ शेअर करत मी आणि रसिका आमने सामने येणार आहोत असं सांगितलं आहे. करोनामुळे गेल्या दोन वर्षापासून अमेरिकेतील बृहन् महाराष्ट्र मंडळाचं संमेलन झालं नव्हतं. यंदा हे संमेलन होणार आहे. याच संमेलनासाठी ‘आमनेसामने’ या नाटकाची निवड झाली आहे. अमेरिकेत सादर होणाऱ्या प्रयोगासाठी रोहन गुजर ऐवजी शशांक केतकर तर मधुरा देशपांडे ऐवजी रसिका सुनील या नाटकात दिसणार आहेत.