JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / शशांक केतकरच्या Hard Core Workout चा व्हिडिओ व्हायरल, कशासाठी करतोय नेमकी तयारी?

शशांक केतकरच्या Hard Core Workout चा व्हिडिओ व्हायरल, कशासाठी करतोय नेमकी तयारी?

टीव्ही जगतातील चॉकलेट बॉय शशांक केतकर (shashank ketkar) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. नुकताच त्याचा एक Hard Core Workout चा व्हिडिओ समोर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 फेब्रुवारी- टीव्ही जगतातील चॉकलेट बॉय शशांक केतकर (shashank ketkar) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो त्याचे व्हिडिओ तसेच फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. शिवाय त्याच्या नवीन काही प्रोजेक्टची माहिती देखील शेअर करत असतो. शशांकची तरूणींमध्ये मोठी प्रचंड क्रेझ आहे. नुकताच शशांकने त्याच्या हार्डकोर वर्कआऊटचा (shashank ketkar Workout) एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शिवाय चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव सुरुच आहे. शशांक केतकरने त्याच्या इन्स्टावर त्याचा वर्कआऊटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, मार्ग योग्य नसेल पण हेतू एकच आहे…..असं म्हणत त्याने 💪🏻 मसल्सची इमोजी पोस्ट केली आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. एकाने म्हटले आहे की, खूप छान आता अजून छान दिसशील, कैटबरी चॉकलेट दिसशील….तर काहींनी लयभारी तर काहींनी लगेरहो म्हणत शशांका प्रोत्साहन दिलं आहे. तर काहींनी नेमकी ही तयारी कशासाठी सुरू आहे असं देखील विचारले आहे. कारण शशांश लवकरच एका नवीन मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. वाचा- आणखी एक लग्न आणि हॅपी एंडिंग! येऊ तशी कशी मी…मालिका संपणार? सध्या सगळीकडे फिटनेसचे वारे जोरात वाहत आहे. मराठी मनोरंजन विश्वात देखील सध्या अनेक कलाकार फिटेनेसचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. फिट ठेवण्यासाठी व्यायाम हा महत्त्वाचा आहे. हा फंडा लक्षात घेऊन अनेक जण फिटनेसकडे लक्ष देताना दिसतात.

संबंधित बातम्या

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर नवीन वर्षात नवीन मालिका भेटायला येणार आहे. 14 फेब्रुवारी 2022 पासून सोमवार ते शनिवार दुपारी 1.30 वाजता ‘मुरांबा’ (Muramba) ही मालिका प्रसारित होत आहे. शशांक केतकर =या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मुरांबा या नव्या मालिकेत शशांक केतकर सोबत अभिनेत्री शिवानी मुंढेकर झळकणार आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पाहायला मिळाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या