JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / '...त्यांनी खड्ड्यात जीव द्या'; का आणि कुणावर इतका भडकला Shashank Ketkar; पाहा VIDEO

'...त्यांनी खड्ड्यात जीव द्या'; का आणि कुणावर इतका भडकला Shashank Ketkar; पाहा VIDEO

राज्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची बिकट परिस्थिती आहे. सध्या पावसाळा सुरु असल्या कारणाने तर नागरिकांना या खड्ड्यांचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. अनेकजण या खड्ड्यांविषयी व्हिडीओ शेअर करत तक्रार करत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 सप्टेंबर : राज्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची बिकट परिस्थिती आहे. सध्या पावसाळा सुरु असल्या कारणाने तर नागरिकांना या खड्ड्यांचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. अनेकजण या खड्ड्यांविषयी व्हिडीओ शेअर करत तक्रार करत आहेत. अशातच अभिनेता शशांक केतकरनेही रस्त्यांवरील खड्ड्यांच्या बिकट परिस्थितीचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये त्याने रस्त्यांची वाईट परिस्थिती दर्शवली आहे. अभिनेता शशांक केतकरने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने मलाड परिसरातील रस्त्यांची अवस्था दाखवलीये. ‘राजकारण बाजूला ठेवून सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन रस्त्यांसाठी काहीतरी करा. कारण यामुळे लोकांचा जीव जातोय कृपा करुन काहीतरी करा’, अशा आशयाचा व्हिडीओ शशांकने शेअर केला आहे. हेही वाचा -  Jeev majha guntala : ‘जीव माझा गुंतला’च्या सेटवर आली अंतरा मल्हारची नवी मैत्रीण; पाहा कोण आहे ही? शशांकने व्हिडीओच्या कॅप्शनमध्येही काही मुद्दे मांडले आहेत. यामध्ये त्याने म्हटलंय की, ‘तू मूळचा पुण्याचा आहेस… तिथल्या रस्त्यांची काळजी कर तू. आम्हाला नको अक्कल शिकवू वगैरे म्हणणार्‍या लोकांनी यातल्याच एका खड्ड्यात जीव द्या. हा video मुळात कोणाच्या तरी support साठी आणि कोणाला तरी विरोध म्हणून केलेला नाही. हे प्रश्न जनतेचे आहेत आणि ते फक्त एका शहरा पुरते मर्यादित नाहीत. हे देशातल्या सगळ्या roads बाददल माझं म्हणण आहे. रस्त्याच्या अशा अवस्थेला जे जबाबदार असतात त्यांनी एकदा हे imagine करून बघाव की ते त्यांच्या लहान मुला मुलीला या international school मध्ये सोडायला bike वरून आले आहेत किंवा म्हातार्‍या आई बाबांना डॉक्टर कडे घेऊन आले आहेत किंवा बायको बरोबर आहेत किंवा अगदी एकटे आहेत आणि ती तुमची bike या खड्यात अडकून बंद पडली, तुमचा तोल गेला, मागून bus आली आणि तुमच्या डोक्याचा चुरा करून गेली! एकदा imagine करा ही भीती!’.

संबंधित बातम्या

शशांक पुढे म्हणाला, ‘उत्तम सोयी आणि उत्तम रस्ते मिळाल्यावर ते नीट वापरण्याची जबाबदारी आपली नागरिकांची सुद्धा आहे. चला एक movement सुरू करु. हा चलता है attitude संपला पाहिजे! तुम्हाला असे रस्ते दिसले तर त्याचा Video post करा. मला आणि योग्य त्या authorities ना त्यात tag करा आणि हे करताना #yenahichalega हा hashtag वापरा’. दरम्यान, शशांकची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकजण त्याच्याशी रिलेट करत आहेत. कमेंटमध्ये तो या मुद्द्याविषयी व्यक्त झाला याबद्दल कौतुक करत आहेत. आता त्याने सुरु केलेल्या #yenahichalega उपक्रमात किती जण भाग घेतात आणि सरकार यावर काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या