Shakira tax fraud case: प्रसिद्ध पॉप गायिका शकीरावर कर फसवणुकीचा आरोप आहे. कर फसवणूक प्रकरणी स्पेनच्या एका न्यायालयाने गायिका शकीराचं अपील फेटाळलं आहे. यानंतर तिच्याविरुद्ध खटल्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे प्रकरण पहिल्यांदा 2018 मध्ये चर्चेत आलं होतं.
आपल्या जबरदस्त गाण्यांमुळे चर्चेत असलेली कोलंबियन गायिका शकीरा सध्या अडचणीत आहे. शकीरावर कर फसवणुकीचा आरोप आहे. कर फसवणूक प्रकरणी स्पेनच्या एका न्यायालयाने गायिका शकीराचं अपील फेटाळलं आहे. यानंतर तिच्याविरुद्ध खटल्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे प्रकरण पहिल्यांदा 2018 मध्ये चर्चेत आलं होतं. (फोटो क्रेडिट-@shakira/Instagram)
2012 आणि 2014 दरम्यान कमावलेल्या उत्पन्नावर 14.5 दशलक्ष युरो (US$15.5 दशलक्ष) कर न भरल्याचा आरोप स्पॅनिश अभियोजकांनी गायिका शकीरावर केला होता. डिसेंबर 2018 मध्ये हे प्रकरण पहिल्यांदा ठळकपणे समोर आलं होतं. (फोटो क्रेडिट-@shakira/Instagram)
या आरोपांनंतर शकीराही कोर्टात हजर झाली. जून 2019 मध्ये साक्ष देताना तिने कोणतंही गैरकृत्य केल्याचं नाकारलं. मात्र, आता तिचं अपील न्यायालयानं फेटाळलं आहे. (फोटो क्रेडिट-@shakira/Instagram)
आता या प्रकरणात, न्यायालयाचं म्हणणं आहे की, त्यांच्याकडे पुरेसे पुरावे आहेत की, शकीराने राज्यात कर भरण्याचं तिचं कर्तव्य पूर्ण केलेलं नाही. अशा स्थितीत शकीरावर कारवाई होऊ शकते. (फोटो क्रेडिट-@shakira/Instagram)
या प्रकरणाचे मूळ पॉप गायिकेच्या घराबाबत सुरू असलेल्या अटकळींमध्ये आहे. बहामासमध्ये अधिकृत निवासस्थान असूनही ती मुख्यतः स्पेनमध्ये राहते, असं न्यायालयाने मानलं आहे. (फोटो क्रेडिट-@shakira/Instagram)
मात्र, शकीराच्या पीआर फर्मने दावा केला की, हे स्पॅनिश कर कार्यालयाकडून त्यांना माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब पैसे भरले. गायिकेच्या लीगल टीमने एका विधानात म्हटलं आहे की, ती "तिच्या निर्दोष असल्याची बाजू ठामपणे मांडत राहील." (फोटो क्रेडिट-@shakira/Instagram)
आता या प्रकरणात गायिकेवरील सर्व आरोप सिद्ध झाले आणि ती दोषी आढळल्यास तिला दंडासह तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. (फोटो क्रेडिट-@shakira/Instagram)
मात्र, जर दोन वर्षांपेक्षा कमी कारावासाची शिक्षा झाली असेल, तर न्यायाधीश प्रथमच गुन्हा करणाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा माफ करू शकतात. फोटो क्रेडिट-@shakira/Instagram