शाहरुख खान
मुंबई, मार्च: शाहरुख खानला बॉलिवूडचा किंग म्हटलं जातं. अभिनेत्याचे जगभरात करोडो चाहते आहेत. शाहरुखही त्याच्या चाहत्यांवर जीवापाड प्रेम करतो. अभिनेत्याची महिला फॅन फॉलोइंगही मोठी आहे. शाहरुखने चित्रपटांमध्ये साकारलेल्या रोमँटिक हिरोच्या भूमिकांमुळे त्याच्यासाठी करोडो मुली वेड्या आहेत. शाहरुख गर्दीत असतानाही तो आपल्या चाहत्यांची विशेष काळजी घेतो. मात्र, शाहरुखला पाहताच चाहत्यांमध्ये त्याला एकदातरी स्पर्श करण्याची, मिठी मारण्याची किंवा त्याच्यासोबत फोटो काढण्याची स्पर्धा सुरू होते. शाहरुखच्या नुकतंच आलेल्या ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शाहरुखची जादू अजूनही कायम असल्याचं दाखवून दिलं आहे. वयाच्या या टप्प्यावरही शाहरुख तरुण पिढीचा आवडता स्टार आहे. गेल्या चार वर्षांपासून जेव्हा त्याचे चित्रपट फ्लॉप ठरत होते, तेव्हाही त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये कोणतीही घट झालेली नव्हती. शाहरुख आपल्याला मिळालेल्या प्रेमानंतर चाहत्यांचे आभार मानायला कधीही विसरत नाही. सोशल मीडियावरही शाहरुखचे चाहते त्याच्यावर भरभरून प्रेम करतात. (हे वाचा: इरफानच्या माघारी त्याच्याच गर्लफ्रेंडला डेट करत होता नवाजुद्दीन; अभिनेत्याला कळताच घातलेला राडा ) 2017 मध्ये एका कार्यक्रमादरम्यान शाहरुख खानने स्वत: सांगितलं होतं की, जेव्हा तो कुठेही जातो तेव्हा त्याच्या महिला चाहत्या त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी धक्काबुक्की करत असतात. पण जेव्हा बॉडीगार्ड्स त्या महिलांना मागे ढकलतात तेव्हा किंग खानला खूप वाईट वाटतं. कारण त्याचे पुरुष बॉडीगार्ड त्याच्या महिला चाहत्यांना धक्का देऊन मागे करत असतात. शाहरुख खान पुढे म्हणाला, “तुम्हाला फक्त हे रहस्य पाळायचं आहे. मी जेव्हा जेव्हा पार्टीला जातो तेव्हा गाडीत काढलेले माझे फोटो मला खूप उत्साहित करतात. अशा अनेक महिला चाहत्या आहेत ज्या मला पसंत करतात आणि मला जवळून पाहू इच्छितात. त्यामुळेच आता माझ्याकडे महिला बॉडीगार्ड आहेत. पूर्वी माझ्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड मुलींना मागे ढकलायचे तेव्हा मला ते आवडत नसे, आणि म्हणूनच मी माझ्या महिला चाहत्यांचा विचार करुन महिला बॉडीगार्ड तैनात केले आहेत.
शाहरुख खानने ‘पठाण’च्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर पडद्यावर पुनरागमन केलं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान यशस्वी ठरला आहे. शाहरुखच्या या चित्रटाने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत नव्हे रेकॉर्ड सेट केले आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख आणि दीपिका पादुकोणची खास केमिस्ट्री पुन्हा एकदा चाहत्यांना अनुभवायला मिळाली आहे.