JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मला वडिलांसारखं मरायचं नाही, ते सर्वात अपयशी...'; 11 वर्षांपूर्वी शाहरूखनं केलं होतं वक्तव्य, Video

'मला वडिलांसारखं मरायचं नाही, ते सर्वात अपयशी...'; 11 वर्षांपूर्वी शाहरूखनं केलं होतं वक्तव्य, Video

2012 मध्ये एका इंटरव्ह्यूमध्ये शाहरुख खानने सांगितले होते की, त्याला त्याच्या वडिलांप्रमाणे मरण्याची इच्छा नाही. त्याने त्याच्या वडिलांचं वर्णन ‘सर्वात यशस्वी अपयशी व्यक्ती’ असं केलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 21ऑक्टोबर : बॉलिवूडमध्ये (Bollywood) यश मिळवणं तशी सोपी गोष्ट नाही. येथे काही कलाकारांकडे एकाहून एक बड्या बॅनर्सचे सिनेमा असतात. काही कलाकारांकडे दिग्दर्शकांची रांग लागलेली असते. तर काही कलाकारांचा संघर्ष काही संपता संपत नाही. कामासाठी स्ट्रगल करावा लागणारे अनेक कलाकार पाहायला मिळतात. पण बॉलिवूडमध्ये एकेकाळी संघर्ष करून आज यशाच्या शिखरावर पोहोचलेले कलाकार आहेत. अशा कलाकारांमधील एक नाव म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार (Superstar) शाहरूख खान (Shahrukh Khan). पण तुम्हाला माहिती आहे का, शाहरूख खान याच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर तो कोणत्या परिस्थितीमधून जात होता ? ‘पत्रिका’ ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. बॉलिवूडचा किंग (King of Bollywood) म्हणून शाहरुख खानला ओळखलं जाते. जगभरात त्याचं फॅन फॉलोइंग आहे. शाहरुखसारखं स्टारडम मला मिळायला हवं, अशी प्रत्येक हिरोची इच्छा असतं. पण शाहरुख आज जिथं आहे, तिथं पोहोचणं त्याच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. त्याचं बालपण गरिबीत गेलं. पण त्याच्या आयुष्यातील सर्वांत वाईट टप्पा तेव्हा आला जेव्हा त्याचे वडील मीर ताज मोहम्मद खान (Mir Taj Mohammad Khan) यांचं निधन झालं. या घटनेनं केवळ शाहरुख खानच नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबालाही मानसिक धक्का बसला होता. मात्र, यानंतरही त्याने हार मानली नाही आणि तो बॉलिवूडचा सुपरस्टार बनला. VIDEO: मुलगा आर्यनला भेटण्यासाठी शाहरुख खान पोहोचला आर्थर जेलमध्ये 2012 मध्ये एका इंटरव्ह्यूमध्ये शाहरुख खानने सांगितले होते की, त्याला त्याच्या वडिलांप्रमाणे मरण्याची इच्छा नाही. त्याने त्याच्या वडिलांचं वर्णन ‘सर्वात यशस्वी अपयश’ असं केलं. या मुलाखतीत शाहरुखने असंही म्हटलं होतं की, वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली होती. ही पोकळी भरून काढण्यासाठी तो अभिनय करतो.’ शाहरुख म्हणाला, ‘आजही माझ्या आयुष्यात कुठेतरी पोकळी आहे. थोडी अस्वस्थता आहे. ही पोकळी मी अभिनयातून भरून काढण्याचा प्रयत्न करतो.’

संबंधित बातम्या

शाहरुखच्या वडिलांना कॅन्सर होता. त्यांचा जेव्हा मृत्यू झाला, तेव्हा शाहरुख हा 15 वर्षांचा होता. शाहरुख वडिलांच्या मृत्युमुळे पूर्णपणे खचला होता. त्यातच ड्रायव्हरने गाडीतून शाहरुखच्या वडिलांचा मृतदेह घरी आणण्यास नकार दिला होता. त्यावेळी शाहरुखला गाडी कशी चालवायची, हे माहीत नव्हतं. पण त्यानंतरही त्याने गाडी चालवली आणि वडिलांचा मृतदेह घरी आणला. या वेळी त्याची आईही त्याच्यासोबत कारमध्ये होती. त्याच्या आईने शाहरुखला विचारलं की, तू गाडी चालवायला कधी शिकलास? यावर त्याने उत्तर दिलं होतं, आत्ताच. क्रिती सेनन बनली अमिताभ बच्चन यांची भाडेकरू; नव्या घरात साजरी करणार दिवाळी शाहरुखच्या बहिणीला तिच्या वडिलांच्या मृत्यूने खूप धक्का बसला आणि ती बेशुद्ध झाली होती. दोन वर्षं त्याची बहीण वडिलांना गमावल्याच्या धक्क्यात होती आणि नैराश्यात गेली. अशा परिस्थितीत शाहरुखने कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. शाहरुख म्हणाला होता, ‘नैराश्य येऊ नये, यासाठी तो अभिनय करतो. शाहरुखला त्याच्या वडिलांचा अभिमान होता, पण वडिलांमध्ये कुठेतरी अपयशाची भीती होती, असं त्याला वाटत होतं. वडिलांप्रमाणे अज्ञात म्हणून मरायचं नाही, असं शाहरुखने बोलून दाखवलं होतं. बॉलिवूडमध्ये यश मिळवण्यासाठी देशभरातून अनेकजण मुंबईमध्ये येत असतात. काही कलाकार कष्टाच्या बळावर यशस्वी होतात. अशा कलाकारांचे यश पाहून अनेकांना वाटते की कदाचित या जागेवर मी असतो तर ? पण या कलाकारांच्या यशामागे एक संघर्षमय कहाणी असते. शाहरूख खानच्या बाबतीत देखील अशी कहाणी आहे. त्याने अज्ञात मरायचं नाही अशी इच्छा व्यक्त केली होती आणि आज तो एक सुप्रसिद्ध स्टार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या