मुंबई, 1 जानेवारी : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मागचं वर्षभर सिनेमांपासून दूर आहे. दरम्यानच्या काळात तो जास्तीत जास्त वेळा त्याच्या कुटुंबाला वेळ देताना दिसला. अशात यंदाचं न्यू ईयर एकत्र सेलिब्रेट करत आहे. त्यामुळे शाहरुखची लेक सुहाना सुद्धा भारतात परतली आहे. पण भारतात आल्यावर लगेचच ती बेस्ट फ्रेंड अनन्या पांडेसोबत अलीबागमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. अलिबागमध्ये धम्माल मस्ती करतानाचे सुहानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. सुहानाच्या फॅनपेज वरुन तिचे अलिबाग व्हेकेशनचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये सुहानासोबत तिचा भाऊ आर्यन खान सुद्धा दिसत आहे. याशिवाय त्यांच्यासोबत त्यांचे मित्र सुद्धा दिसत आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. वयाच्या 13 व्या वर्षी आयुष्यात आलेल्या वादळानं नाना पाटेकरांना शिकवला अभिनय
सुहाना खाननं तिचं ग्रॅज्युएशन नुकतंच पूर्ण केलं. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी सुहाना न्यूयॉर्कमध्ये राहत आहे. मागच्या बऱ्याच काळापासून तिच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चर्चा सुरु आहेत. पण सुहाना बॉलिवूड पेक्षा हॉलिवूडमध्ये जास्त इंटरेस्टेड आहे. नुकतीच तिची हॉलिवूड शॉर्टफिल्म सुद्धा रिलीज झाली. त्यातील तिच्या अभिनयचं खूप कौतुकही झालं. इटलीमध्ये रोमँटिक झाली सोनम कपूर, शेअर केला पतीसोबतचा लिपलॉक KISS VIDEO Fitness बाबत जागरुक असणाऱ्या तापसी पन्नूच्या दिवसाची ‘अशी’ होते सुरुवात