JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘किंग खान’ Shahrukh नं चाहत्यांना दिली Good News, 'या' बड्या दिग्दर्शकासोबत करणार सिनेमा

‘किंग खान’ Shahrukh नं चाहत्यांना दिली Good News, 'या' बड्या दिग्दर्शकासोबत करणार सिनेमा

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान( Shahrukh Khan) गेले अनेक दिवस मनोरंजनसृष्टीपासून दूर होता. शाहरुखचे चाहते गेले अनेक दिवस त्याच्या चित्रपटांची प्रतीक्षा करत आहेत. चाहत्यांची ही प्रतिक्षा संपली असून त्याचा लवकरच नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जाहिरात

Shahrukh Khan

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी: बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान  (Shahrukh Khan) गेले अनेक दिवस मनोरंजनसृष्टीपासून दूर होता. शाहरुखचे चाहते गेले अनेक दिवस त्याच्या चित्रपटांची प्रतीक्षा करत आहेत. चाहत्यांची ही प्रतिक्षा संपली असून त्याचा लवकरच नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे,  बड्या दिग्दर्शकासोबत नवा चित्रपट करणार असून त्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. शाहरुखच्या आगामी ‘पठाण’, ‘टायगर 3’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटांच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. शाहरुख खान पुढील दोन महिने ‘पठान’ या चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. याशिवाय तो राजकुमार हिरानीसोबत एक चित्रपट करत आहे. त्यामुळे शाहरुख लवकरच अनेक चांगल्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मार्च 2022 पासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी यांना खूप दिवसांपासून एकमेकांसोबत काम करायचे होते. या प्रोजेक्टसाठी दोघेही खूप उत्सुक आहेत. प्री-प्रॉडक्शनचे काम आधीच सुरू झाले आहे. इतकेच नाही तर मुंबईतील फिल्मसिटीमध्ये पंजाबच्या गावाचा मोठा सेट बसवण्यात येणार आहे. कंस्ट्रक्शनचे कामही लवकरच सुरू होणार आहे. चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण येथे होणार आहे. याशिवाय चित्रपटाचे शूटिंग लंडन आणि बुडापेस्ट येथे होणार आहे. तापसी पन्नू देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. ‘जेव्हाही असे काही घडते, तेव्हा मी त्याची माहिती देणारी पहिली असेल. पण प्रथम गोष्टी अंतिम व्हायला हव्यात कारण अशा अफवाच उडतील. मी सर्व फायनल झाल्यावर ओरडून घोषणा करेन. मी खूप उत्साही आहे. असी माहिती तापसीने एका वृत्तसंस्थेली दिली. शाहरुख ‘जीरो’ चित्रपटामध्ये शेवटचा दिसला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले होते. या चित्रपटाला लोकप्रियतेचे शिखर गाठता आले नव्हते. शाहरुख लवकरच सिद्धर्थ आनंदच्या ‘पठान’ चित्रपटात दिसून येणार आहे. तसेच,च्या आगामी सिनेमात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमदेखील मुख्य भूमिकेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या