JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / शाहरुख खानचा बॉडी डबल दिवसाला करतो एवढी कमाई, रक्कम ऐकून व्हाल हैराण

शाहरुख खानचा बॉडी डबल दिवसाला करतो एवढी कमाई, रक्कम ऐकून व्हाल हैराण

शाहरुखचा बॉडी डबल प्रशांत वाल्दे याची सुद्धा फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 मे : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे फक्त भारतातच नाही तर जगभरात लाखो चाहते आहेत. अनेक अभिनेते सुद्धा त्याला आणि त्याच्या अभिनयाला फॉलो करतात. पण शाहरुखच्या या स्टारडमसोबत त्याचा बॉडी डबल प्रशांत वाल्दे याची सुद्धा फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख आहे. प्रशांत वाल्दे बॉलिवूडमध्ये शाहरुखचा बॉडी डबल म्हणून काम करतो. त्यानं आतापर्यंत ‘ओम शांति ओम’, ‘डॉन 2’, ‘फैन’ और ‘रब ने बना दी जोड़ी’ या सिनेमांमध्ये काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं त्याच्या लाइफ बद्दल अनेक खुलासे केले. शाहरुखचा प्रशांत वाल्देनं काही दिवसांपूर्वी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखती स्वतःबद्दल बरेच खुलासे केले. प्रशांतनं सांगितलं, मी त्या सर्व डायरेक्टर्सचा सहाय्यक आहे. ज्यांच्या सिनेमात शाहरुख खान मुख्य भूमिकेत असतो. शाहरुखच्या अनुपस्थितीत मला डमी म्हणून वापरलं जातं. कॅमेरा टेस्टिंग, रिहर्सल मध्ये इतर कलाकारांना सीन समजावण्यासाठी आणि चीट शूटिंगसाठी माझा वापर केला जातो. लॉकडाऊनध्ये दिशाचा धम्माल डान्स, कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही टायगर

संबंधित बातम्या

प्रशांत वाल्देनं यावेळी त्याच्या फी विषयीही खुलासा केला. शाहरुखचा बॉडी डबल म्हणून काम करण्यासाठी प्रशांतला प्रती दिन 30 हजार रुपये मानधन दिलं जातं. प्रशांतनं शाहरुखसोबत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. बॉलिवूड किंग शाहरुख खाननं 2018 पासून कोणताही सिनेमा केलेला नाही. तो शेवटचा झीरो या सिनेमात दिसला होता आणि हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला होता. त्यानंतर त्यानं कोणत्याही सिनेमा साइन केलेला नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याच्या अपकमिंग सिनेमाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. शाहरुखनं फराह खानच्या नवऱ्याला लगावली होती कानशीलात, वाचा नेमकं काय घडलं जेव्हा ‘गे’ म्हणणाऱ्या ट्रोलरवर भडकला होता करण, सडेतोड उत्तर देत केली बोलती बंद

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या