टीव्हीचा सर्वात चर्चित शो बिग बॉसचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पाहा कोणत्या कलाकारांचा यावेळी समावेश होऊ शकतो.
छोट्या पडद्यावरील सर्वात चर्चित शो बिग बॉसच्या (Bigg Boss) १५व्या सीझनची आता तयारी सुरू आहे. तर अनेक कलाकारांची नाव समोर येत आहेत. पाहा संपूर्ण लीस्ट.
मागच्या सिझनप्रमाणे याही पर्वात कपल एन्ट्री होणार असल्याचं समजतं आहे तर दिव्यांका त्रिपाठी आणि पती विवेक दहिया हे कपल दिसणार असल्याचं समोर येत आहे.
'बालिका वधू' फेम अभिनेत्री नेहा मर्दाने काही दिवसांपूर्वीच कन्फर्म केलं होतं की तिला बिगबॉस साठी विचारण्यात आलं आहे.
अनुषा दांडेकर सध्या एक्स बॉयफ्रेंड करण कुंद्रामुळे चर्चेत आली होती. ती देखिल बिग बॉस 15 मध्ये दिसू शकते. तिला संपर्कही करण्यात आला होता.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील दया म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी देखिल या पर्वात दिसण्याची शक्यता आहे.
टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता पार्थ समथानला मागील अनेक दिवसांपासून या शो साठी मेकर्स आप्रोच करत आहेत. पण या सिझनमध्ये तो दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती देखिल या शो मध्ये दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एक्स बिग बॉस स्पर्धक राहूल वैद्यची प्रेयसी दिशा परमार देखिल शो मध्ये दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.