JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / संजय लीला भन्साळीची ड्रीम वेबसीरीज 'हीरामंडी'मध्ये किती आहेत गाणी?जाणून घ्या डिटेल्स

संजय लीला भन्साळीची ड्रीम वेबसीरीज 'हीरामंडी'मध्ये किती आहेत गाणी?जाणून घ्या डिटेल्स

‘गंगुबाई काठियावाडी’ नंतर दिग्दर्शक आणि निर्माते संजय लीला भन्साळी हे त्यांच्या ड्रिम प्रोजेक्ट असणाऱ्या ‘हीरा मंडी’ (Heeramandi) या वेबसीरिजचं (web series) काम पूर्ण करीत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21ऑक्टोबर-  बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक-निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) हे सध्या खूप व्यस्त आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने भन्साळी हे त्यांचा ड्रिम प्रोजेक्ट वेगाने पूर्ण करण्यात व्यग्र आहेत. त्यांनी नुकतेच ‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काम पूर्ण केले आहे. या चित्रपटात आलिया भट्ट (Alia Bhatt) हिची प्रमुख भूमिका आहे. ‘गंगुबाई काठियावाडी’ नंतर दिग्दर्शक आणि निर्माते संजय लीला भन्साळी हे त्यांच्या ड्रिम प्रोजेक्ट असणाऱ्या ‘हीरा मंडी’ (Heeramandi) या वेबसीरिजचं (web series) काम पूर्ण करीत आहे. या वेबसीरिजमध्ये तब्बल 16 ते 20 गाणी असू शकतात. ‘पाकिजा’ आणि ‘उमराव जान’ या पूर्वीच्या काळातील चित्रपटांच्या प्रेक्षकांसाठी ही वेबसीरिज बनवण्यात येत नाहीय, तर आजच्या तरुणपिढीला विचारात घेऊन ही वेबसीरिज बनवली जात आहे. ही वेबसीरिज डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तिचे पोस्टर रिलीज करून ही माहिती आधीच देण्यात आली आहे. भन्साळी प्रॉडक्शनने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितलं होतं की, ‘ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘एका महाकाव्याचा अनुभव तुमची वाट पाहत आहे. या कथेचं चित्रीकरण तुम्हाला नक्कीच आनंद देईल. ही कथा आणताना आम्हाला आनंद होतोय. ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.’ (**हे वाचा:** टॅलेंट दाखव बॉडी नको’, विचित्र ड्रेसमुळे BB OTT फेम उर्फी जावेद पुन्हा ट्रोल ) ‘हीरा मंडी’ हा भन्साळींचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. ते 12 वर्षांपासून त्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रेक्षकांना हे जाणून आश्चर्य वाटेल की, संजय लीला भन्साळी या वेबसीरिजची निर्मिती करत आहेत, ते वेबसीरिजच्या दिग्दर्शनात फारसे योगदान देणार नाहीत. ‘हीरा मंडी’ या वेब सीरिजमध्ये एकूण 7 एपिसोड आहेत, त्यापैकी भन्साळी फक्त पहिल्या एपिसोडचे दिग्दर्शन करणार आहेत. उर्वरित 6 भाग विभू पुरी दिग्दर्शित करणार आहेत.‘हीरा मंडी’ या वेबसीरिजमध्ये एका वेश्येची कथा दाखवली जाईल. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ‘हीरा मंडी’ लाहोरचा एक जिल्हा होता. या वेबसीरिजमध्ये संजय लीला भन्साळी यांचे सर्व ट्रेडमार्क दिसतील. भव्य सेट, उत्तम रचना यासोबतच प्रेम, फसवणूक, यश आणि राजकारणाशी संबंधित ही वेबसीरिज असणार आहे.या नव्या वेबसीरिजमुळे गेल्या काही दिवसांपासून भन्साळी सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ‘हीरा मंडी’ मधून भन्साळी एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आता या वेबसीरिजविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या