लाइम लाइटपासून दूर राहणाऱ्या त्रिशालाला बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून काम करायचं होतं. पण संजय दत्तने असं होऊ दिलं नाही.
संजय दत्तची मुलगी त्रिशाला तिच्या प्रियकराच्या आकस्मित मृत्यूमुळे चर्चेत आली. त्रिशालाने प्रियकराच्या मृत्यूवर एक भावनिक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली. त्रिशाला ही बॉलिवूडमधील अशा स्टार किड्सपैकी एक आहे जी लाइम लाइटपासून दूर राहते. पण तरीही मीडियाची आवडती स्टार किड आहे. त्रिशालाने तिचा एखादा फोटो शेअर केला आणि तो व्हायरल झाला नाही असं तर होतंच नाही. ती कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी ग्लॅमरस नाही.
फार कमी लोकांना माहीत आहे की लाइम लाइटपासून दूर राहणाऱ्या त्रिशालाला बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून काम करायचं होतं. पण संजय दत्तने असं होऊ दिलं नाही. आपल्या मुलीने अभिनेत्री व्हावं अशी संजयची कधीच इच्छा नव्हती त्यामुळे तिला कधी सिनेसृष्टीत येऊच दिलं नाही. एका मुलाखतीत संजयने स्वतः सांगितलं की, ‘जेव्हा मला कळलं की तिला अभिनेत्री व्हायचं आहे तेव्हा मी स्पष्ट नकार दिला. तसेच असं करण्याचा प्रयत्न जरी केला तरी तंगड्या तोडून घरी बसवेन असंही सांगितलं होतं.’
संजयला त्रिशालाने तिच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावं अशी इच्छा होती. तिने फॉरेन्सिक सायन्समध्ये चांगलं शिक्षण घेतलं आहे आणि तिने त्यातच करिअर करावं असं त्याला वाटत होतं. त्यात बॉलिवूड अभिनेत्री होण्यासाठी फार महत्त्वाचं असतं ते हिंदी. त्यात अमेरिकन भाषेतले हिंदी उच्चार इथे चालणार नाहीत. तिला खूप जास्त मेहनत घ्यावी लागेल.
त्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची मुलगी आहे. त्रिशालाचं संपूर्ण आयुष्य अमेरिकेत गेलं. तिला फिरायला आणि पार्टी करायला फार आवडतं.
त्रिशाला अगदी संजयसारखीच दिसते. तिला वडिलांप्रमाणेच एक कलाकार व्हायचं होतं. त्रिशाला अभिनेत्री जरी झाली नसली तरी तिने अनेक फॅशन ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग केलं आहे. तिचे काही फोटोशूटही तुफान व्हायरल झाले होते.
त्रिशाला तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंसाठीही नेहमी चर्चेत राहते. त्रिशालाला पाहून कोणीही म्हणेल की ती बॉलिवूडमधील कोणत्याही अभिनेत्रीला सहज टक्कर देऊ शकेल.