Saniya chaudhari
मुंबई, 08 सप्टेंबर : सध्या मराठी मालिकाविश्वात वेगवेगळ्या मालिका पाहायला मिळत आहे. विविध विषय मालिकांमधून हाताळले जात आहे. मालिकेची नायिका शिक्षित दाखवत प्रेक्षकांचाही या प्रयोगाला पाठींबा मिळतो आहे. झी मराठीवर येणाऱ्या काळात वेगळ्या मालिका येत आहे. ‘दार उघड बये’ ही मालिका म्हणजे एका संबळ वादक मुलीची कहाणी असणार आहे. या मालिकेच्या पहिल्याच प्रोमोने लक्ष वेधून घेतलं होतं. मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेत्री सानिया चौधरी झळकणार आहे. तिने या मालिकेसाठी खास संबळ वादनाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सानिया चौधरी अभिनेत्री दीपा परबसोबत एका सार्वजनिक कार्यक्रमात गेली होती. तिथे तिने सगळ्यांना संबळ वादन करून दाखवलं आहे. त्याचा व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडिओत ती अतिशय उत्साहात संबळ बावदन करत असून सगळे लोक तिच्याकडे कौतुकाने पाहत आहेत. तिच्या या व्हिडिओवर चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत. या व्हिडिओमधून समजत आहे कि या भूमिकेसाठी सानियाने किती मेहनत घेतली आहे. संबळ वादनाचे योग्य प्रशिक्षण घेऊनच ती ही भूमिका साकारत आहे.
‘दार उघड बये’ या मालिकेतील तिच्या भूमिकेबद्दल बोलताना सानिया म्हणाली कि, ‘‘मी मुक्ता ही भूमिका साकारत असून घर सावरण्यासाठी घरूनच चालत आलेली संबळ वाजण्याची कला मी आत्मसात करते. अर्थार्जन करून संबळ वाजवण्याची परंपराही जोपासते. हे एक असं गाव आहे जिथे मुलीच्या हातात संबळ बघणं एक अपशकुन मानलं जातं. फक्त त्या गावात नाही तर महाराष्ट्रातील बऱ्याच गावांमध्ये अजूनही मुलींनी संबळ वाजवणं चांगलं मानलं जात नाही. अश्या गावात एक साधी, गरीब पण स्वाभिमान जपणारी मुलगी आणि पुरुष प्रधान संस्कृती ह्यांचा लढा या मालिकेत दिसून येणार आहे.’’ हेही वाचा - Tu tevha tashi : अनामिकाने दिला लग्नाला नकार; आकाशच्या एन्ट्रीने मालिकेत नवा ट्विस्ट प्रेक्षकांसाठी ही मालिका बघणं रोमांचक ठरणार आहे. या मालिकेत ‘सानिया चौधरी’ मुख्य भूमिका साकारत आहे. नाटक, मालिकां मध्ये उत्कृष्ट अभिनय करून सानियाने आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ती एक उत्तम नृत्यांगना आहे. तिने याआधी स्टार प्रवाहावरील ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. आता तिला नवीन भूमिकेत बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. “दार उघड बये” ही नवीन मालिका १९ सप्टेंबर २०२२ पासून, सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेचा प्रोमो बघून प्रेक्षकांची उत्कंठा नक्कीच शिगेला पोहोचली असेल. शरद पोंक्षे, सुहास परांजपे, किशोरी आंबिये, रुचिरा जाधव’ अशी कलाकारांची फौज या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.