मुंबई, 22 फेब्रुवारी : बॉलिवूडमधली बोल्ड, ब्युटीफुल अभिनेत्री नोरा फतेही (Bollywood Actress Nora Fatehi) तिच्या बोल्ड Attitude साठी, डान्स सीनसाठी कायमच चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये तिची अनेक सुपरहिट गाणी असून, तिचे हावभाव प्रेक्षकांना गुंतवून ठेवतात. अगदी काही काळातच नोराने आपला डान्स, अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर नोराचा मोठा फॅन क्लबदेखील आहे. नोरा कमालीची डान्सर असून, तिचा डान्स वेगवेगळ्या चित्रपटांमध्येदेखील पाहायला मिळाला आहे. नोरा फतेही तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. एका व्हायरल व्हिडिओमुळे आता ती पुन्हा चर्चेत आली आहे (Nora Fatehi duplicate). सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला या व्हिडिओने सर्वांनाच धक्का दिला आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला लॅपटॉपवर नोरा फतेहीचा फोटो दिसतो आहे. त्यानंतर तिथंच खुर्चीत बसलेली एक व्यक्ती दिसते, जी अगदी नोरासारखीच दिसते. पण तिला नोरासारखे लांब केस नाहीत आणि तिची वागणूकही थोडी वेगळी आहे. खरंच ही व्यक्ती नोरा आहे, तिने आपलं रूप बदललं आहे, असंच आपल्याला वाटतं (Boy look same to same like nora fatehi). हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युझर्स बुचकळ्यात पडले आहेत. सध्या सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय ठरला आहे. हे वाचा - मनोज वाजपेयीच्या ‘फॅमिली मॅन’ विषयी समोर आली मोठी अपडेट पण खरंतर ही नोरा नसून दुसरीच कोणीतरी व्यक्ती आहे. ती व्यक्ती हुबेहूब नोरासारखी दिसते आहे. यातली धक्कादायक बाब म्हणजे, ही नोरासारखी दिसणारी व्यक्ती एक पुरुष आहे.
जगात एकसारखे दिसणारे 7 चेहरे असतात, असं म्हटलं जातं. हे वाक्य कितपत खरं आहे हे सांगणं तसं कठीण आहे. परंतु एकसारखी चेहरेपट्टी असलेल्या अनेक व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. जग फार मोठं असून आपल्या चेहऱ्यासारखं साम्य असलेल्या अनेक व्यक्ती आढळतात. याला आपण निसर्गाचा चमत्कार म्हणू शकतो. बॉलिवूडमध्येही असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचा चेहऱ्यासारखा चेहरा असलेल्या दुसऱ्या व्यक्ती पाहायला मिळाल्या आहेत. आता या लिस्टमध्ये अभिनेत्री नोरा फतेहीचं नाव समाविष्ट झालं आहे. हे वाचा - कतरिना- विकी लग्नानंतर पहिल्यांदा जोडीने लावणार ‘या’ टीव्ही शोमध्ये हजेरी? खूप जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून, अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. नोरा फतेहीने हा व्हिडिओ नक्कीच पाहिला पाहिजे, अशी कमेंट एका युझरने केली आहे. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नोरा काय म्हणते, हे पाहणं मजेशीर ठरेल.