मुंबई, 22 मार्च : सध्या देशभरात कोरोना व्हायरसचं थैमान पाहायला मिळत आहे. चीनपासून सुरू झालेल्या या व्हायरसनं संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. भारतातही या व्हायरसचे 300 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. या व्हायरसवर कोणत्याही प्रकारचं औषध नाही. त्यामुळे त्यापासून वाचण्यासाठी गर्दीपासून लांब राहणं, स्वतःची स्वच्छता राखणं, अशा सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे. अशाअनेक बॉलिवूड सेलिब्रेटी कोरोनापासून वाचण्यासाठी शक्य ते उपाय करण्याचं आणि स्वतःची काळजी घेण्याची विनंती करताना दिसत आहेत. अशात सध्या सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये भाईजान सर्वांवर नाराज असलेला पाहायला मिळत आहे. सलमान खाननं त्याच्या सोशल मीडियावर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो सर्वांवर रागावलेला दिसत आहे. याचं कारण आहे सध्या देशात कोरोनानं थैमान घातलेलं असताना लोकांचा निष्काळजीपणा. सलमाननं त्याच्या या व्हिडीओमधून लोकांना त्यांच्या सुरक्षेकडे गंभीरतेनं पाहण्याचा सल्ला दिला आहे. अंकिता लोखंडे मारतेय चक्क आरशासोबत गप्पा! बाथरोबमध्ये दिसला BOLD अंदाज
या व्हिडीओमध्ये सलमान सांगतो. बसमध्ये, ट्रेनमध्ये, मार्केटमध्ये. प्रत्येक ठिकाणी लोक बाहेर जाण्यासाठी भांडताना दिसत आहेत. हा कोणताही पब्लिक हॉलिडे नाही आहे. हा खूप गंभीर विषय आहे. हे सर्व बंद करा. मास्क वापरा, स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्या, हात धुवा, स्वच्छ राहा, गर्दीपासून दूर राहा. हे सर्व करायला तुम्हाला समस्या काय आहे. यामुळे जर एखाद्याचा जीव वाचत असेल. अनेकांचा जीव वाचत असेल तर हे करा. हा सर्वांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे माझी विनंती आहे सर्वांना की घरी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. अमेरिकेतून परतल्यावर अनुपम खेर यांनी केलं असं काही की आई झाली नाराज सलमान खाननं या व्हिडीओमध्ये #IndiaFightsCorona हा हॅशटॅग वापरला आहे. याशिवाय या व्हिडीओमध्ये त्यानं आदित्य ठाकरेंना सुद्धा टॅग केलं आहे. या व्हिडीओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. प्रत्येकजण यात सलमानला सपोर्ट करताना दिसत आहेत. ट्रेनमधून प्रवास करत होती रवीना टंडन, Coronavirus च्या भीतीनं साफ केली पूर्ण सीट