JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / सलमान खानच्या शूटची तारीख ठरली, Corona च्या पार्श्वभूमीवर कसं सुरू आहे शूटिंग - पाहा PHOTO

सलमान खानच्या शूटची तारीख ठरली, Corona च्या पार्श्वभूमीवर कसं सुरू आहे शूटिंग - पाहा PHOTO

बॉलिवूडचा चुलबूल पांडे सलमान खान 2ऑक्टोबरपासून राधे सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. कर्जतमध्ये 15 दिवस शूटिंग करून तो वांद्र्याच्या मेहबूब स्टुडिओमध्ये उरलेलं शूट पूर्ण करणार आहे.

0107

बॉलिवूडचा चुलबूल पांडे सलान खान 2ऑक्टोबरपासून शूटिंगला सुरुवात करणार आहे. राधे सिनेमाच्या शूटिंगसाठी सलमान सज्ज झाला आहे. कर्जतमध्ये 15 दिवस शूटिंग करुन तो वांद्र्याच्या मेहबूब स्टुडिओमध्ये उरलेलं शूट पूर्ण करणार आहे.

जाहिरात
0207

राधे सिनेमाचं शूटिंग मुंबईबाहेर सुरू आहे. रोजचा प्रवास टाळण्यासाठी सिनेमाची संपूर्ण टीम सध्या शूटिंग सुरू असलेल्या ठिकाणाजवळच राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण खबरदारी घेऊनच शूट केलं जाणार आहे.

जाहिरात
0307

सूत्रांच्या माहितीनुसार संपूर्ण टीमची कोरोनाची चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सिनेमाच्या संपूर्ण टीमला सेटवर काम करताना कोरोनाच्या गाइडलाइन्सचं पालन करणं आवश्यक आहे. सलमान खान स्वत: सेटवर स्वच्छता आणि फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करण्याबाबत आग्रही आहे.

जाहिरात
0407

सलमान खानसोबत त्याचा भाऊ सोहेल खानही या सिनेमाचा भाग असणार आहे. राधे (Radhe) सिनेमाचं शूट पुन्हा सुरू झालं, त्यामुळे आम्ही आनंदी आहोत. अशी प्रतिक्रिया सोहेलने दिली. त्यासोबतच सेटवर कायम डॉक्टर आणि रुग्णवाहिका असेल अशीही माहिती त्याने दिली.

जाहिरात
0507

सेटवर उपस्थित असलेल्या प्रत्येकाची दुसरी कोरोना चाचणी करण्यात येईल अशी माहिती सोहेलनं दिली आहे. सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करत आम्ही शूटिंगला प्रारंभ करत आहोत, आमच्या टीमला गरज असेल तिथे पीपीई कीट्स दिले जाणार आहेत. तसंच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सेटवर केला जाईल असंही सोहेलने सांगितलं.

जाहिरात
0607

अतुल अग्निहोत्रीने राधेच्या शूटिंगबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, कर्जत आणि मुंबईतलं शूटिंग येत्या 15 ते 20 दिवसांत पूर्ण होईल. सिनेमातले काही अक्शन सिक्वेन्ससुद्धा या वेळेत शूट केले जाणार आहेत. यासाठी खास चेन्नईवरुन अक्शन डिरेक्टरही आला आहे.

जाहिरात
0707
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या