JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Anant Ambani Wedding : सलमान खान ते आलिया: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या ग्रॅंड पार्टीत स्टार्सचा जलवा

Anant Ambani Wedding : सलमान खान ते आलिया: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या ग्रॅंड पार्टीत स्टार्सचा जलवा

अनंत अंबानी आणि राधिकाच्या ग्रॅंज पार्टी बॅशला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली.

जाहिरात

अंबानी ग्रॅंड पार्टी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 डिसेंबर : नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. नीता आणि मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा नुकताच साखरपुडा झाला असून तो लवकरच राधिका मर्चंटसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. काल 29 डिसेंबर रोजी अनंत आणि राधिकाचा साखरपुडा झाला. राजस्थानमधील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात अंबानी आणि मर्चट कुटुंबीयांचा हा खास कार्यक्रम संपन्न झाला. सध्या सर्वत्र अनंत आणि राधिकाच्या साखरपुड्याची चर्चा आहे. या समांरंभातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अंबानी आणि मर्चंट कुटुंबीयांच्या या समारंभानंतर त्यांनी पार्टीही आयोजित केली होती. या पार्टीमध्ये बॉलिवूड कलाकारांचीही उपस्थिती होती. त्यांनी आपल्या ग्लॅमरस अंदाजात या पार्टीला चार चांद लावले. अनंत अंबानी आणि राधिकाच्या ग्रॅंज पार्टी बॅशला आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हातात हात घालून पोहोचले होते. यादरम्यान रणबीरने काळा कुर्ता पायजमा आणि नेहरू जॅकेट घातले होते. तर आलियाने पांढऱ्या रंगाचा चमकदार ड्रेस घातला होता.

अंबानींच्या पार्टीमध्ये शाहरुख खान आणि सलमान खाननेही हजेरी लावली होती. शाहरुख खान त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबत पार्टीमध्ये आला होता.

संबंधित बातम्या

जान्हवी कपूरनेही या पार्टीला  ग्लॅमर तडका लावला. पार्टीसाठी जान्हवीने गुलाबी रंगाची साडी घातली होती. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जान्हवीसोबत तिचा एक्स बॉयफ्रेंड शिखर पहाडियादेखील पहायला मिळाला.

जाहिरात

अभिनेता रणवीर सिंहनेदेखील या पार्टीला हजेरी लावली. रणवीरने नेहमीप्रमाणे त्याच्या लुकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. अंबानींच्या पार्टीसाठी रणवीरने काळ्या रंगाचा आऊटफिट घातला होता आणि त्याच्यावर मॅचिंग अशी टोपीही घातली होती.

जाहिरात

गायक मिका सिंहदेखील अंबानीच्या पार्टीला उपस्थित होता. यावेळी त्याने गाणेही गायले.

जाहिरात

दरम्यान, राधिका आणि अनंत लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. 2018 मध्ये राधिका आणि अनंतचे एकत्र फोटो व्हायरलर झाले होते तेव्हापासून दोघांमधील नात्याची पुष्टी झाली. त्यानंतर दोघांनी अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात आलं. अंबानींच्या सगळ्याच कार्यक्रमात राधिका स्पॉट झाली. अनंत आणि राधिका आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

सध्या सर्वत्र अनंत अंबानी आणि त्याची होणारी बायको राधिका मर्चंटची चर्चा सुरु आहे. दोघांचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या