Salman Khan
मुंबई, 27 डिसेंबर: बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान (Salman Khan Birthday) आज 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र, बी टाउनमध्ये त्याच्या या वाढदिवासासोबत त्याला चावलेल्या सापाची चर्चा अधिक रंगली आहे. काल, त्याला त्याच्याच पनवेलच्या फार्म हाऊसवर सापाने दंश केला होता. सापाने दंश केल्यानंतर सलमान खान याच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याने माध्यामांना सापसंदर्भात भयावह घटना सांगत माझी आणि सापाची झाली मैत्री झाली (Salman Khan says snake bit him thrice, but they parted as friends)असल्याचेही गंमतीने म्हटले आहे. इतकेच नव्हे तर सेल्फीदेखील घेतला असल्याचे सलमानने म्हटले आहे. मीडीयाशी संवाद साधताना सलमान म्हणाला, फार्म हाऊसमधील खोलीत सापाने शिरकाव केला. त्यावेळी घरातील लहान मुले प्रचंड घाबरली होती. सापाला बाहेर काढण्यासाठी मी लाकडाची काठी मागितली, ती लहान होती. त्यानंतर लाकडाची मोठी काठी मला देण्यात आली. या काठीच्या आधारे मी सापाला काळजीपूर्वक उचलले आणि घराबाहेर आणले. काठीवर असलेला साप माझ्या हाताच्या दिशेने येत होता. सापाला घराबाहेर नेत असताना मी दुसऱ्या हातात काठी घेतली आणि त्याला घराबाहेर सोडले.
मी काठीने त्याला बाहेर काढले. हळूहळू तो माझ्या हाताजवळ आला. मी त्याची सुटका करण्यासाठी त्याला पकडलं, त्यावेळी त्याने माझा तीनदा चावा घेतला. हा एक प्रकारचा विषारी साप होता. मला 6 तास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मी आता ठीक आहे” अशी माहिती खुद्द अभिनेता सलमान खानने दिली आहे. सापाने मला बर्थडे गिफ्ट दिलं, असंही तो गंमतीत म्हणाला.
तसेच तो पुढे म्हणाला, सापाने दंश केला तेव्हा बहीण अर्पिता खूपच घाबरली होती. तोपर्यंत माझी आणि सापाची मैत्री झाली होती. त्याच्यासोबत मी सेल्फीदेखील काढला असल्याचेही सलमानने हसत-हसत सांगितले. सर्पदंशाच्या घटनेनंतर सलमानला 6 तास रुग्णालयात ठेवण्यात आले होते, त्यानंतर त्याला घरी येण्याची परवानगी देण्यात आली. साप चावल्यानंतर सलमान खानला नवी मुंबईतील कामोठे येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.