JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / निमित्त होतं ‘भारत’च्या सक्सेस पार्टीचं पण, चर्चा मात्र भाईजानच्या शर्टचीच

निमित्त होतं ‘भारत’च्या सक्सेस पार्टीचं पण, चर्चा मात्र भाईजानच्या शर्टचीच

Salman Khan या पार्टीमध्ये सलमानसोबत त्याची गर्लफ्रेंड यूलिया वंतूरही दिसली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जून : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान सध्या त्याचा सिनेमा ‘भारत’ला मिळालेल्या यशामुळे खूप खुश आहे आणि तो सध्या तो हे यश सेलिब्रेट करत आहेत. भारतनं पहिल्याचं दिवशी 42 कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली. ज्याची संपूर्ण बॉलिवूडमध्ये चर्चा झाली. या सिनेमाच्या सक्सेसबद्दल नुकत्याच एका पार्टीच आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सलमान सोबत त्याची गर्लफ्रेंड यूलिया वंतूरही दिसली. मात्र या सगळ्याच चर्चा झाली ती सलमाननं घातलेल्या ब्लू चेक्स शर्टची. या शर्टमधील सलमानचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम बबीता रिअल लाइफमध्ये करतेय टप्पूला डेट?

काही दिवसांपूर्वीच ईदच्या मुहूर्तावर सलमानचा भारत सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगला गल्लाही जमवला. त्या निमित्तानं सलमानचा भाऊ अरबाजनं सर्वांना पार्टी दिली. या पार्टीमध्ये सलमानसोबत त्याची गर्लफ्रेंड यूलिया वंतूरही दिसली. बॉलिवूड सोबतच या पार्टीची चर्चा सोशल मीडियावरही झाली आणि त्याचं कारणही तसंच होतं. पार्टीमध्ये सलमान पोहोचला त्यावेळी सर्वांच्या नजरा सलमान आणि यूलियावर खिळल्या. अभिनेता वरुण धवन ‘या’ दिवशी अडकणार लग्नाच्या बेडीत सलमान या पार्टीत ब्लॅक ट्राउझर, व्हाइट शर्ट आणि ब्लू चेक्स शर्टमध्ये दिसला. पण जेव्हा तो पार्टी संपवून निघाला तेव्हा तो फक्त व्हाइट शर्ट आणि ट्राउझरवर दिसला आणि तो शर्ट मात्र यूलियाच्या हातात होता. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. तसं पाहायला गेलं तर यूलिया आणि सलमान यांचं नातं जगजाहीर आहे. पण सलमानचं शर्ट यूलियाच्या हातात दिसणं हा प्रकार सर्वांनाच नवा होता. त्यामुळे पार्टीपेक्षा जास्त चर्चा सलमानच्या शर्टचीच झाली. ‘हा’ पाहा राणादाचा मेकओव्हर, मालिकेत आता दाक्षिणात्य तडका ======================================================== SPECIAL REPORT: आगीचा खेळ, अस्वलाचे हाल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या