आगामी दिवसांमध्ये परिस्थिती पाहता पुढील महिन्यात ही मदत वाढवली जाणार आहे. तसेच सलमान खान मे महिन्यात आणखी 19 हजार कामगारांना मदत करणार आहे.
मुंबई, 23 एप्रिल : बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या फिटनेससाठी विशेष प्रसिद्ध आहे. वयाच्या 54 व्या वर्षी सुद्धा तो फिटनेसबाबतीत अनेकांना प्रोत्साहन देत असतो. मात्र सलमान खानने नुकत्याच्या केलेल्या ट्वीटवरून असं दिसत आहे की, तो दुसऱ्याच कोणाच्यातरी फिटनेसचा फॅन झाला आहे. अभिनेता सलमान खान याने चक्क राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या फिटनेसचे कौतुक केले आहे. ‘प्रफुल सर, आताच तुमचा फिटनेस व्हिडीओ पाहिला.. Superb!’ अशा शब्दात सलमानने प्रफुल पटेल यांचं कौतुक केलं आहे. या ट्वीटवर प्रफुल पटेल यांनी नेहमी प्रेरणा देण्यासाठी सलमानचे आभार देखील मानले आहेत.
दरम्यान सलमान खान ज्या फिटनेस व्हिडीओबाबत बोलला तो नेमका कोणता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेता प्रफुल पटेल यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटवरून शेअर केला होता. अनेक नेतेमंडळींना आणि सलमान खानला देखील पटेल यांनी या व्हिडीओमध्ये टॅग केलं होतं. ‘मी घरातच राहणार असून निरोगी आणि अॅक्टिव्ह राहणार आहे’, अशी कॅप्शन देत त्यांनी शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, सलमान खान, किरण रिजीजू यांना देखील फिट राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यावर रिप्लाय देताना सलमान खान याने त्यांचं कौतुक केलं आहे. या व्हिडीओमध्ये प्रफुल पटेल विविध प्रकारचे व्यायामप्रकार, योग करताना दिसत आहेत.
दरम्यान या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी देखील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी देखील प्रफुल पटेल यांंच्या फिट राहण्याचं कौतुक केलं आहे. ‘तसंच कोव्हिड-19 ला हरवल्यानंतर आपण फुटबॉल खेळू..’ असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
सध्या कोरोनाशी लढताना प्रत्येकानी फिट राहणं अत्यंत गरजेचे आहे. आपली रोगप्रतिकारक्षमताच या संकटाच्या काळात तारणहार आहे. त्यामुळे सेलिब्रिटींकडून प्रेरणा घेत सर्वांनीच निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करायला हवे. संपादन - जान्हवी भाटकर