JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सलमानच्या 'या' चाहतीनं रिलीजच्या आधीच पाहिला 'भारत', दिग्दर्शकांनी केला खुलासा

सलमानच्या 'या' चाहतीनं रिलीजच्या आधीच पाहिला 'भारत', दिग्दर्शकांनी केला खुलासा

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळापासून एक सामान्य नागरिक ते नौदल अधिकारी असा प्रवास सलमान मोठ्या पडद्यावर साकारत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुबंई, 4 मे : अभिनेता सलमान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘भारत’मुळे खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यामुळे आधीपासूनच असलेली या सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. सिनेमाच्या प्रदर्शनला जवळपास 1 महिना उरला असताना हा सिनेमाच्या सलमानच्या एका जवळच्या चाहतीनं पाहिल्याची माहिती समोर आली आहे आणि याचा खुलासा खुद्द सिनेमाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनीच केला आहे. सूत्राच्या माहितीनुसार अली अब्बास जफर यांनी सांगितलं, ‘या सिनेमाचं शूटिंग आणि बाकी सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर हा सिनेमा पहिल्यांदा सलमानची भाची अलीजा अग्निहोत्री हिनं पाहिला आहे.’ त्यासोबतच त्यांनी यामागचं कारणही सांगितलं. अली म्हणाले,  मी कोणताही सिनेमा बनवल्यावर तो सिनेमा सर्वात आधी एखाद्या तरुण मुलाने किंवा मुलीने पाहावा असा माझा नेहमीच प्रयत्न असतो. माझ्या मते, जर तो सिनेमा आपोआपच त्यांच्याहून जास्त वयाच्या लोकांनाही आवडेल. त्यामुळे मी हा सिनेमा अलीजाला दाखवला आणि ती ‘भारत’ पाहणारी पहिली व्यक्ती बनली.

सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला ‘भारत’ हा साउथ कोरियन ‘ओड टू माय फादर’ या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. या सिनेमामध्ये 1950 ते 2014 पर्यंतचा काळ एका सामान्य व्यक्तीच्या नजरेतून मांडण्यात आला होता आणि ‘भारत’मध्येही काहीसं असंच दाखवण्यात आलं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळापासून एक सामान्य नागरिक ते नौदल अधिकारी असा प्रवास सलमान मोठ्या पडद्यावर साकारत आहे. ‘भारत’मध्ये सलमानसोबत दिशा पटानी आणि कतरिना कैफ प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा 5 जूनला ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

टायगर श्रॉफसोबत पहिल्या ऑनस्क्रीन किसच्या प्रश्नावर अनन्या पांडेनं दिलं ‘हे’ उत्तर कॅनडा माझं घर आहे रिटायर झाल्यावर इथेच स्थायिक होणार, अक्षय कुमारचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या