सलमान खान
**मुंबई, 15 ऑक्टोबर :**बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानचे चाहते नेहमीच त्याच्या चित्रपटाची आवर्जून वाट पाहतात आणि त्याच्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला असतो यात शंका नाही. आजच, सलमान खान ने घोषणा केली की ‘किसी का भाई किसी की जान’ आणि ‘टायगर ३’ हे त्याचे दोन आगामी अॅक्शन-पॅक चित्रपट पुढच्या वर्षी २०२३च्या ईद आणि दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहेत. सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टायगर 3’ बद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे. निर्मात्यांनी त्याची रिलीज डेट बदलली आहे. हा चित्रपट आधी 2023 च्या ईदला रिलीज होणार होता, पण आता त्याची रिलीज डेट वाढवण्यात आली आहे. ‘टायगर 3’चे हे पहिले पोस्टर समोर आले असून त्यात सलमानची थोडीशी झलक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, सलमान खानचे चित्रपट प्रामुख्याने ईदच्या दिवशी प्रदर्शित होताना पाहायला मिळाले आहेत. ‘वॉन्टेड’ नंतर ‘दबंग’, ‘बॉडीगार्ड’, ‘एक था टायगर’, ‘किक’, ‘बजरंगी भाईजान’, ‘सुलतान’, ‘ट्यूबलाइट’ आणि ‘भारत’सह आता ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट २०२३ मधील ईदला सिनेमागृहात दर्शकांच्या भेटीला दाखल होणार आहे. फरहाद सामजीद्वारा दिग्दर्शित ‘किसी का भाई किसी की जान’ची निर्मिती सलमान खान फिल्म्सने केली असून या अॅक्शन-पॅक चित्रपटात पूजा हेगडे, दग्गुबती व्यंकटेश आणि जगपती बाबू यांच्याही भूमिका आहेत. हेही वाचा - Hrithik Roshan : ‘हँडसम हंक हृतिक रोशनला पडतंय वडिलांसारखं टक्कल’; ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये रंगली चर्चा तसेच, पुढच्या वर्षी दिवाळीत मनीष शर्माद्वारा दिग्दर्शित ‘टायगर 3’सह सलमान खान टायगरच्या रूपात परत येईल. ‘टायगर’ फ्रँचायझीतील पहिले दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले असतानाच, आता ‘टायगर 3’देखील यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे. हा चित्रपट सलमान खान आणि कतरिना कैफच्या जोडीला दर्शकांसमोर पुन्हा आणेल. ‘टायगर 3’ या चित्रपटाचे जगभरात चित्रीकरण झाले असून, निर्माते YRF नी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांना अॅक्शन-पॅक अनुभव देण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही.
सलमान खानचे हे दोन्ही आगामी चित्रपट पुढच्या वर्षी ईद आणि दिवाळीला दर्शकांच्या भेटीला येणार असून, प्रेक्षकांसाठी भरपूर मनोरंजन घेऊन येईल यात शंका नाही. सध्या सलमान ‘बिग बॉस 16’ तसेच ‘किसी का भाई किसी की जान’चे शूटिंग करत आहे.