JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Salman Khan-Mamta Banerjee: सलमान खान ममता बॅनर्जींच्या भेटीला; तब्बल अर्धातास रंगली चर्चा,काय होतं कारण?

Salman Khan-Mamta Banerjee: सलमान खान ममता बॅनर्जींच्या भेटीला; तब्बल अर्धातास रंगली चर्चा,काय होतं कारण?

Salman Khan met Mamata Banerjee: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकाता येथे भेट घेतली.

जाहिरात

सलमान खानने घेतली ममता बॅनर्जींची भेट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 मे- बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकाता येथे भेट घेतली. ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी ही बैठक झाली. सलमान खानला वारंवार धमक्या मिळत असताना दरम्यान ही कोलकत्ता भेट झाली आहे. बॉलिवूड सुपरस्टारला यावर्षी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा कडक करण्यात आली आहे हे चाहत्यांना चांगलंच ठाऊक आहे. यापूर्वी सलमान खान ने धमकी मिळाल्यानंतर आपली कोलकत्ता टूर पुढे ढकलली होती. सलमान खान नेहमीच माध्यमांना हसून प्रतिसाद देत असतो. याठिकाणीही असंच काहीसं पाहायला मिळालं. कारमधून खाली उतरताच सलमानने ममता बॅनर्जी यांच्या घराबाहेर उपस्थित असलेल्या मीडिया फोटोग्राफर्सना हात उंचावत प्रतिसाद दिला. त्याच्यासोबत त्याचा अंगरक्षक शेराही होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांकडून अभिनेत्याचे जंगी स्वागत करण्यात आलं. दोघांनी पापाराझींना एकत्र पोजही दिली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सलमानने कॅज्युअल हाफ स्लीव्हज शर्ट आणि जीन्सची निवड केली होती. (हे वाचा: Waheeda Rehman B’day:जेव्हा वहिदा रहमानने अमिताभ यांना सर्वांसमोर लगावली कानाखाली, सुन्न झालेले बिग बी; काय होतं कारण? ) खरं सांगायचं तर, सलमान खान आपल्या ‘दबंग टूर’ या लाईव्ह शोच्या निमित्ताने कोलकत्तामध्ये पोहोचला आहे. सलमान खान जगभरात आपला शो करत असतो. यामध्ये विविध कलाकार सहभागी होत असतात. नुकतंच कोलकत्तामध्ये या शोचं आयोजन करण्यात आलं होतं. यापूर्वीच हा शो होणार होता. मात्र सलमान खान सतत मिळत असलेल्या धमक्यांमुळे दक्षता म्हणून हा शो पुढे ढकलण्यात आला होता. दरम्यान काल हा शो पार पडला. याच शोपुर्वी सलमान खानने ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोघांमध्ये तब्बल अर्धातास चर्चा रंगल्याच सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

सलमान खान त्याच्या दबंग टूरसाठी शुक्रवारी संध्याकाळी कोलकत्ताच्या नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला होता. त्याच्यासोबत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस, प्रभूदेवा आणि आयुष शर्मा होते. सलमानची ‘किसी का भाई किसी की जान’ची सहकलाकार पूजा हेगडे देखील या कॉन्सर्टमध्ये सहभागी झाली होती. शिवाय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेसुद्धा या कॉन्सर्टमध्ये परफॉर्म केलं आहे.

एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, आयोजकांनी पूर्वी सांगितलं होतं की, कलाकारांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी त्यांना पश्चिम बंगाल सरकार आणि उच्च पोलीस अधिकाऱ्यांकडून मदत मिळत आहे. त्यांनी घेतलेल्या दक्षतेबाबत विशिष्ट तपशील उघड केला नसला तरी, त्यांनी चाहत्यांना आश्वासन दिले की सर्वकाही योग्यरित्या काळजी घेतली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या