JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बॉलिवूडमध्ये फक्त हिटच नाही तर फिटही आहे सलमान खान, हा घ्या पुरावा!

बॉलिवूडमध्ये फक्त हिटच नाही तर फिटही आहे सलमान खान, हा घ्या पुरावा!

सलमान खानच्या भारत सिनेमाने आतापर्यंत २५० कोटींचा गल्ला कमावला आहे. यानंतर सलमान दबंग- ३, इंशाअल्लाह आणि किक २ या सिनेमांमध्ये दिसणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 जून- सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या भारत सिनेमाचं यश एन्जॉय करत आहे. भारत सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सलमान अचानक सोशल मीडियावर कमालिचा सक्रिय झाला आहे. दररोज तो आपला एखादा फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असतो. यात भाच्यांसोबत मस्ती करतानाचा व्हिडिओ असो किंवा घोड्यासोबतची रेस असो सलमानच्या प्रत्येक पोस्ट या व्हायरल होतातच. सलमान बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. याचा पुरावा त्यानेच फोटो आणि व्हिडिओ शेअर करून दिला. नुकताच त्याने लेग स्प्ल्टि करताचा एक फोटो शेअर केला. सलमानचा हा फोटो त्याच्या चाहत्यांना तुफान आवडत आहे.

सलमान खानच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, नुकताच प्रदर्शित झालेल्या भारत सिनेमाने आतापर्यंत २५० कोटींचा गल्ला कमावला आहे. यानंतर सलमान दबंग- ३, इंशाअल्लाह आणि किक २ या सिनेमांमध्ये दिसणार आहे. सध्या तो दबंग ३ च्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

जाहिरात
जाहिरात

या सिनेमात त्याच्यासोबत सोनाक्षी सिन्हा असणार आहे. तर या सिनेमाच्या चित्रीकरणानंतर तो लगेच इंशाअल्लाहच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. या सिनेमातून सलमान आणि आलिया भट्ट ही अनोखी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जाहिरात

VIDEO: विदर्भ, मराठवाड्यात मान्सूनची एन्ट्री, मुंबईकडे फिरवली पाठ

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या