JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / साईशानं 'या' लोकप्रिय ट्रेंडवर केला भन्नाट डान्स, क्यूटवाला video viral

साईशानं 'या' लोकप्रिय ट्रेंडवर केला भन्नाट डान्स, क्यूटवाला video viral

झी मराठीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेतील सर्वांची लाडकी चिंगी म्हणजे साईश भोईर हिचा देखील सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिचा एका नवीन व्हडिओ समोर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 मार्च- सध्या सोशल मीडियावर बाल कलाकारांची चांगलीच चलती आहे. सोशलम मीडियावरील विविध ट्रेंड देखली हे चिमुकले कलाकार फॉलो करताना दिसतात. झी मराठीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेतील सर्वांची लाडकी चिंगी म्हणजे साईश भोईर हिचा देखील सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिचा एका नवीन व्हडिओ समोर आला आहे. यामघध्ये ती #TumTum ट्रेंडवर धमाल डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. राजश्री मराठीनं नुकताच साईशाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये साईशा पांढऱ्या रंगाच्या पार्टी वेअर ड्रेसमध्ये दिसत आहे. नेहमीप्रमाणे ती यामध्ये क्यूट दिसत आहे. विशेष म्हणजे ज्या #TumTum ट्रेंडनं कॉमन मॅनपासून सेलेब्सपर्यंत सर्वांना वेड लावले आहे त्या ट्रेंडवर आता सायसाने देखील क्यूट डान्स केला आहे. चाहत्यांना देखील तिचा हा डान्स आवडलेला आहे. वाचा- ‘पडदा आणि ड्रेस एक सारखाच..’ नेटकऱ्याच्या कमेंटवर सईचं सडेतोड उत्तर स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली बालकलाकार म्हणजे साईश भोईर. मालिकेत तिनं कार्तिकीची भूमिका साकारली होती. मात्र अल्पावधीतच साईशानं मालिकेतून एक्झिट घेतली. साईशा आता मालिकेत काम करणान नाही का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलेला असताना साईशा भोईरची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. झी मराठीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेत साईशानं एंट्री घेतली आहे. नव्या मालिकेच्या सेटवरही साईशा चांगलीच धु़डगूस घालत आहे. साईशा फार मस्तीखोर आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र ती ज्यांना भेटते त्यांच्याबरोबर काय करते हे सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली बालकलाकार म्हणजे साईश भोईर. मालिकेत तिनं कार्तिकीची भूमिका साकारली होती. मात्र अल्पावधीतच साईशानं मालिकेतून एक्झिट घेतली.त्यानंतर साईशा भोईरची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली.

झी मराठीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेत साईशानं एंट्री घेतली. या मालिकेत ती रमाच्या मुलीची म्हणजे चिंकीची भूमिका साकारताना दिसत आहे. तिच्या या भूमिकेवर चाहते देखील भरभरून प्रेम करताना दिसतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या