अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) मुख्य भूमिकेत असलेल्या ‘आठवा रंग प्रेमाचा’ ( Aathva Rang Premacha) या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. रिंकू सिनेमात प्रोस्थेटिक मेकअपसह (Prosthetic Makeup ) अभिनय करताना दिसतेय. रिंकूच्या लुकची सर्वत्र चर्चा आहे मात्र त्याचप्रमाणे अशाप्रकारच्या भूमिका केलेल्या अभिनेत्रींचीही चर्चा सुरू आहे. कोण आहेत त्या अभिनेत्री ज्यानी साकारलीय प्रोस्थेटिक मेकअपसह दमदार भूमिका. जाणून घ्या.
अभिनेत्री रिंकू राजगुरूचा आठवा रंग प्रेमाचा हा सिनेमा 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय.
सिनेमात रिंकूचा लुक पाहून तिचे चाहते चांगलेच हैराण झालेत. अँसिड हल्ल्यातील पीडित स्त्रिची भूमिका रिंकू यात साकारत आहे.
रिंकूचा सिनेमातील लुकची आणि तिच्या प्रोस्थेटिक मेकअपची सध्या चांगलीच चर्चा आहे. सिनेमात रिंकूसह अभिनेते मकरंद देशपांडे प्रमुख भूमिकेत आहेत.
याआधी अशाप्रकारची अँसिड पीडित स्त्रिची भूमिका अभिनेत्री दीपिका पादुकोन हिने 'छपाक' सिनेमात साकारली होती.
अँसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवालची कहाणी सिनेमातून दाखवण्यात आली होती. दीपिकाच्या या लुकसाठी तिचं फार कौतुक झालं होतं.
दीपिकाच्या आधी अभिनेत्री झीनत अमन हिनं 'सत्यम शिवम सुंदरम' या सिनेमात प्रोस्थेटिक मेकअप करत दर्जेदार भूमिका साकारली होती.
एका छोट्या गावातील मुलीचा लहानश्या अपघातात चेहरा बदलू जातो. जीनत अमन संपूर्ण सिनेमात प्रोस्थेटिक मेकअपसहीत दिसली होती.
केवळ सिनेमातच नाही तर टेलिव्हिजनवरही अशाप्रकारची भूमिका अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिनं साकारली होती. 'ये हैं मोहब्बते' या मालिकेत तिनं शन्नो ही भूमिका साकारली होती.
छपाक या सिनेमाआधी आलेल्या 'अँसिड' या सिनेमातही अभिनेत्री प्रियांका सिंह हिने अँसिड व्हिक्टिमची व्यक्तिरेखा साकारली होती.
अमिताभ बच्चन यांचा 'पा', राजकुमार रावचा 'राब्ता', शाहरुख खानचा 'फॅन', 'रावन', ऋषी कपूर याचा 'बडे दूर आये हो' , रजनीकांत यांचा 'रोबोट' यासारख्या अनेक हिंदी सिनेमांमध्ये प्रोस्थेटिक मेकअपचा वापर करण्यात आला आहे.
'अगडबम' या मराठी सिनेमातही मोठ्या प्रमाणात प्रोस्थेटिक मेकअपचा वापर करण्यात आला होता.