बिग बॉस मराठी (Big Boss Marathi) मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) सध्या मराठमोळ्या अंदाजाने चाहत्यांचा लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
मराठीतील अगदी सगळ्याच अभिनेत्रींना साड्यांबद्दल प्रचंड आकर्षण आहे आणि सई सुद्धा त्यातलीच एक आहे.
सध्या तिच्या नव्या लूकची बरीच चर्चा होताना दिसत आहे. यामध्ये सईने पारंपरिक नऊवारी साडी परिधान केली असून त्याला साजेसे पारंपरिक दागिने सुद्धा तिने घातले आहेत.
अनेक चाहत्यांनी तिला कमेंट करून तिच्या या लुकची तारीफ केली आहे. तर काहींनी काहीसा काळजीचा सूर पकडला आहे.
सई सध्या कोणत्याचं नव्या प्रोजेक्टमधून का दिसत नाहीये असं सुद्धा एका युजरने तिला कमेंट करून विचारलं आहे.
अभिनयासोबत सई एक यशस्वी उद्योजिका सुद्धा आहे. सई स्वतःचा ज्वेलरी ब्रँड चालवते ज्याचं नाव ‘सांज बाय सई’ असं आहे.
सईने बिग बॉस मराठीतून चाहत्यांच्या हृदयात जागा मिळवली आहे पण तिला लवकरच नव्या प्रोजेक्टमध्ये पाहण्यासाठी चाहते आतुर झाले असल्याचं पाहायला मिळत आहे.