JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / धन्यवाद! Sadak 2 ट्रेलरला डिसलाइक करणाऱ्यांचे पूजा भट्टने हात जोडून मानले आभार

धन्यवाद! Sadak 2 ट्रेलरला डिसलाइक करणाऱ्यांचे पूजा भट्टने हात जोडून मानले आभार

Sadak 2 Trailer बॉलिवूडमध्ये आतापर्यंत सर्वाधिक डिसलाइक झालेला ट्रेलर आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 ऑगस्ट : सडक 2 (Sadak 2) चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी रिलीज झाला आहे. हा ट्रेलर रिलीज होताच याला लाखो डिसलाइक्स मिळाले आहेत. सडक 2 च्या ट्रेलर्सने  (Sadak 2 Trailer) डिसलाइक्सचा रेकॉर्ड मोडला आहे. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत सर्वाधिक डिसलाइक झालेला हा ट्रेलर आहे आणि हा ट्रेलर्स डिसलाइक करणाऱ्यांचे अभिनेत्री आणि निर्माती पूजा भट्टने हात जोडून आभार मानले आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमचा वाद सुरू झाला आणि त्यामुळेच अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt), संजय दत्त (Sanjay Dutt) आणि आदित्य रॉय कपूर स्टाटर फिल्म सडक 2 ला सोशल मीडियावर जोरदार विरोध केला जातो आहे. नुकतंच एका ट्वीटर युझरने पूजा भट्टला टॅग करून यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यावर पूजा भट्टनेही उत्तर दिलं आहे.

ट्विटर युझरने म्हटलं, “पूजा भट्ट हेटर्सबाबत चिंता करू नकोस. लाखो डिसलाइक्स मिळाल्यानंतरही सडक 2 पहिल्या क्रमांकावर ट्रेंडिंग आहे. फिल्मसाठी शुभेच्छा” या युझरच्या पोस्टवर पूजाने प्रतिक्रिया दिली आहे. पूजाने हसण्याचा इमोजी टाकला आहे.

“मला अजिबात चिंता नाही. स्तुती करणारे आणि निंदा करणारे हे दोघंही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुमचा अमूल्य वेळ देण्यासाठी आणि ट्रेलर ट्रेंडिंगमध्ये ठेवण्यासाठी मला दोघांनाही श्रेय द्यावं लागेल. तुमच्या शुभेच्छांसाठी आभारी आहे”, असं म्हणत पूजाने हात जोडले आहेत. हे वाचा -  सुशांत, शोविकसह एकाच दिवसात स्वीसचा दोनदा दौरा; रियावर ईडीचा संशय अधिकच वाढला सडक-2 मधील मूख्य भूमिकेतील सर्वच कलाकार स्टार किड्सपैकी एक आहेत. महेश भट्ट यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलं आहे. सुशांतच्या निधनानंतर महेश भट्ट यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचं शिकार व्हावं लागलं होतं. त्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या मुलींना घेऊन करण्यात आलेल्या या चित्रपटाला रोषाचा सामना करावा लागत आहे. याआधी या सिनेमाची घोषणा झाल्यानंतर महेश भट्ट आणि सिनेमातील कलाकारांना रोषाचा सामना करावा लागला होता. दरम्यान आता ट्रेलर लाँच झाल्यानंतर सिनेमा न पाहण्याची भाषा पुन्हा एकदा सोशल मीडियावर केली जात आहे. चित्रपटावर बहिष्कार टाकण्याबाबत सोशल मीडियावर चर्चा केली जात आहे. आलियाने या ट्रोल्सना कंटाळून सोशल मीडियावर कमेंट सेक्शन बंद ठेवले आहे. यावरून देखील तिला ट्रोल करण्यात आले होते. हे वाचा -  Highest Paid Actors: द रॉक’ पहिल्या क्रमांकावर, टॉप 10 मध्ये अक्षय कुमार सडक-2 हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर 28 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमधून आलिया-आदित्यची अर्थात आर्या-विशालची लव्ह स्टोरी या सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे, हे स्पष्ट समजते आहे. संजय दत्त रवि नावाच्या एका ट्रॅव्हल एजंटच्या भूमिकेत आहे. या सिनेमामध्ये देखील खलनायकामुळे हिरो-हिरोईनला वेगळे व्हावे लागणार असल्याची पटकथा आहे. अद्याप या ट्रेलरबाबत फार चांगल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत नाही आहेत. एके काळच्या हिट सिनेमाचा सिक्वेल म्हणून सडक-2 चर्चेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या