मुंबई, 24 जुलै : भारतीय कलाकारांना एअरपोर्टवर चुकीची वागणूक मिळण्याची आणखी एक घटना अमेरिकेत घडली आहे. या वेळी Sacred Games या लोकप्रिय वेबसीरिजमध्ये काम केलेल्या अभिनेत्रीच्या बाबतीत ही घटना घडली आहे. नवाझुद्दीन सिद्दिकी Nazwzuddin Siddiqui आणि सैफ अली खान Saif ali khan यांनी गाजवलेल्या Netflix वरच्या Sacred Games या वेससीरिजमधली एक कलाकार एल्नाज नौरोजीला elnaaz norouzi शिकागो एअरपोर्टवर स्थानिक पोलीस आणि सुरक्षारक्षकांकडून वाईट वागणूक मिळाली. एल्नाजला शिकागो विमानतळावर रोखून धरण्यात आलं आणि तब्बल 3 तास तिची चौकशी झाली. यामुळे एल्नाजची फ्लाईटसुद्धा चुकली. तिच्या पुढच्या प्रवासाचं सगळं वेळापत्रक कोलमडलं. इराणी असल्यामुळे एल्नाज यांना त्रास देण्यात आला, असं तिचं म्हणणं आहे. बाबो ! ऑर्डर केलेल्या दोन केळ्यांचं एवढं बिल; हॉटेल जोमात अभिनेता कोमात एल्नाज म्हणाली, “मला 3 तासांहून अधिक काळ इमिग्रेशनवाल्यांनी रोखून धरलं होतं. एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी मला माझ्या कनेक्टिंग फ्लाइटसाठी जाऊ दिलं नाही.” एल्नाजनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्याकडे जर्मन पासपोर्ट आहे. त्यामुळे अमेरिकेत जाण्यासाठी वेगळा व्हिसा लागत नाही. अमेरिकेत ट्रंप प्रशाननानं काही इराणी नागरिकांवर बंदी घातली आहे. त्यामुळेच एअरपोर्टवर अधिकारी इराणी नागरिकांची कसून चौकशी करतात. या चौकशीच्या कचाट्यात एल्नाज सापडली. निकच्या VIRAL शर्टलेस फोटोची नेटीझन्सनी उडवली खिल्ली, म्हणाले… एल्नाज नौरोजी Sacred Games च्या पहिल्या सीझनमध्ये होती. तिने झोया मिर्झाची भूमिका केली होती.
आता सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीझनमध्येसुद्दा ती दिसणार आहे. Sacred Games 2 येत्या 15 ऑगस्टपासून Netflix वर दिसणार आहे. ——————————————————– VIDEO: दहशत पसरवण्यासाठी भरदिवसा नेमबाजाला तीन तरुणांची बेदम मारहाण