बॉलिवूडमध्ये एकाचवेळी दोन किंवा त्याहून अधिक सिनेमा रिलीज होणार असं जर तुम्हाला सांगितलं तर त्यात नवल असं काहीच नाही.
बॉलिवूडमध्ये एकाचवेळी दोन किंवा त्याहून अधिक सिनेमा रिलीज होणार असं जर तुम्हाला सांगितलं तर त्यात नवल असं काहीच नाही. आतापर्यंत अनेकदा असे अनेक सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाले आहेत. पण हेच जर बॉलिवूडच्या तीन मोठ्या स्टार्सच्या बाबतीत घडलं तर मात्र बॉक्स ऑफिसवर बराच गोंधळ उडतो.
यंदा 15 ऑगस्टला काहीसं असंच चित्र पाहायला मिळणार आहे. साउथ सुपरस्टार प्रभासनं ‘बाहुबली’ सिनेमामुळे बॉलिवूडमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यानंतर आता तो ‘साहो’ सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
यावेळी मात्र ‘साहो’चा मार्ग काहीसा कठीण असणार आहे. कारण याच दिवशी बॉलिवूडमधील आणखी दोन ब्लॉकबास्टर सिनेमा प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे या सिनेमासाठी कलेक्शनचा मार्ग काहीसा कठीण असणार आहे.
याच दिवशी अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ हा सिनेमाही प्रदर्शित होणार आहे. मिशन मंगल ही मंगळ ग्रहावर भारताचं स्पेस पाठवण्याची खरी कहणी आहे. नुकताच या सिनेमाटा टीझर प्रदर्शित करण्यात आला. एक देश. एक स्वप्न. एक इतिहास, भारताची मंगळ ग्रहापर्यंत जाण्याची खरी गोष्ट, अशी या सिनेमाची टॅग लाइन आहे. अक्षय कुमारसह या सिनेमात विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी अशी तगडी स्टार कास्ट असणार आहे.
अक्षय कुमार आणि प्रभासला अजून एक हिरो टक्कर द्यायला येणार आहे तो म्हणजे डॉन अब्राहम. बाटला हाउस या त्याच्या आगामी सिनेमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 9 सप्टेंबर 2008 मध्ये जामिया नगर येथील बाटला हाउसमध्ये इंडियन मुजाहिद्दीनविरुद्ध करण्यात आलेल्या ऑपरेशनवर हा सिनेमा भाष्य करतो.
हे तर झालं सिनेमांचं. सिनेमांव्यतिरिक्त प्रेक्षकांचं मनोरंजन करायला नवाजुद्दीन सिद्दीकीचा गणेश गायतोंडेही येत आहे. अर्थात सिक्रेड गेम्सचा सिझन २ येत आहे. या सिझनचा पहिला एपिसोड 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.