JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ऋतुजा बागवेचा 'तो' Photo पाहून 'या' अभिनेत्रीने तिला घातली लग्नाची मागणी

ऋतुजा बागवेचा 'तो' Photo पाहून 'या' अभिनेत्रीने तिला घातली लग्नाची मागणी

ऋतुजा बागवेने (Rutuja Bagwe Latest Photo ) नुकतेच तिचे खणाच्या साडीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर कमेंटचा पाऊस पडत आहे. विशेष म्हणजे तिचा हा साडीतील सुंदर फोटो पाहून मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिला चक्क लग्नाची मागणी घातली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

**मुंबई, 28 सप्टेंबर ;**मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवे **(Rutuja Bagwe )**सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिचे विविध फोटो व व्हिडिओ तसेच तिच्या आगामी प्रोजेक्टसंबंधीत माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असते. ऋतुजा बागवेने (Rutuja Bagwe Latest Photo ) नुकतेच तिचे साडीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर कमेंटचा पाऊस पडत आहे. विशेष म्हणजे तिचा हा साडीतील सुंदर फोटो पाहून मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिला चक्क लग्नाची मागणी घातली आहे. ऋतुजा बागवेने तिच्या इन्स्टावर खण साडीतील एक फोटो तसेच व्हिडिओ देखील शेअर केला आहे. विशेष म्हणजे ऋतुजाने खण साडी नेहमी नेसतो तशी नाही तर तिला ट्वीस्ट दिला आहे. हा फोटो शेअर करत खण saree with a twist असे तिने म्हटले आहे. रणबीरच्या वाढदिवसाला अर्जुन कपूरने आलियाकडे केली खास विनंती; पोस्ट होतेय VIRAL ऋतुजा बागवेने चॉकलेटी रंगाची खण साडी नेसली आहे. या साडीवर पांढऱ्या रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज देखील तिने घातला आहे. नेहमीपेक्षा वेगळे म्हणजे ऋतुजाने साडीचा पदर गळ्याला गुंडाळून हातवर घेतला आहे. तिचा सारी विथ ट्वीस्ट लूक चाहत्यांना तर आवडलाच आहे. तर मराठमोळी अभिनेत्री अक्षया नाईकने देखील कमेंट करून प्रतिक्रिया दिली आहे. अक्षयाने माझ्यशी लग्न करशील का ?..अशी मागणीच घातली आहे. सध्या अक्षयाची कमेंट व ऋतुजा बागवेचे खण साडीतील फोटो सोशल मीडियावर चर्चेता विषय ठरला आहे.

अक्षया नाईक सध्या सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत लतिकाची भूमिका साकरताना दिसत आहे. तर ऋतुजा बागवे नुकतीच चंद्र आहे साक्षीला या मालिकेत दिसली होती. आता अक्षयाच्या या कमेंटवर ऋतुजा काय प्रतिक्रिया देते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

ऋतुजा बागवेलाच्या ‘अनन्या’ या नाटकातील अतुलनीय अभिनयासाठी बारा मानाच्या पुरस्कारांनी तिचा गौरव करण्यात आला आहे.‘नांदा सौख्य भरे’ मालिकेतून ऋतुजा बागवेने छोट्या पडद्यावर एंट्री केली आणि तिने रसिकांचे मनोरंजन केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या