JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / The Fast and the Furious च्या दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचा आरोप, महिलेचा खळबळजनक खुलासा

The Fast and the Furious च्या दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचा आरोप, महिलेचा खळबळजनक खुलासा

दिग्दर्शनक रॉब कोहेनची मुलगी Valkyrie Weather हिने सुद्धा काही वर्षांपूर्वी त्याच्यावर छेडछाड केल्याचा आरोप केला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 सप्टेंबर : हॉलिवूड सिनेमा ‘फास्ट अँड द फ्यूरियस’च्या दिग्दर्शकावर रॉब कोहेनवर लैंगिक शोषणाचा आरोप लावण्यात आला आहे. रॉबवर असा आरोप लावणारी महिला जेननं, बेशुद्ध अवस्थेत असताना रॉबनं माझ्यावर अतिप्रसंग केला असा खुलासा एका मुलाखतीत केला. हफपोस्टनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार जेननं सांगितलं की, ही घटना 2015 मधील आहे. एका टीव्ही प्रोग्राम संबंधित बिझनेस मिटिंग दरम्यान या दोघांची ओळख झाली होती. मिटिंगनंतर जेन आमि रॉब यांनी एकत्र डिनर केलं. त्यानंतर तिची तब्बेत बिघडली. मात्र तिच्या कामाचा भाग असल्यानं तिनं रॉबसोबत बारमध्ये जाण्यासाठी होकार दिला. त्यानंतर जेनला काहीही आठवत नाही. तिला फक्त आठवतं की, जेव्हा ती शुद्धीवर आली त्यावेळी ती रॉबसोबत नको त्या अवस्थेत होती. EXCLUSIVE: Bigg Boss 13च्या स्पर्धकांची यादी झाली लीक, पाहा कोण कोण होणार सहभागी

रिपोर्टनुसार या घटनेनंतर जेननं रॉबकडे मेडिकल ट्रीटमेंट मागितली होती. या घटनेबाबत आणखी दोन व्यक्तींनी जेनला पाठिंबा दिला आहे. त्यांनी सांगितलं, जेनसोबत जेव्हा ही घटना घडली त्यावेळी तिनं लगेचच याबाबत या दोन व्यक्तींना त्याची माहिती दिली होती.

जाहिरात

रॉबला याबाबत विचारलं असता, त्यानं हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्याचं म्हणणं आहे की, त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप हे चुकीचे आहेत. रॉबचा वकील मार्टिन सिंगरनं म्हटलं, आरोपांची ही काहाणी फक्त माझ्या क्लायंटला गंभीर आरोपांखाली फसवण्यासाठी केला आहे. यामागे माझ्या क्लायंटची प्रतिमा मलीन करण्याचा हेतू आहे. मात्र माझ्या क्लायंटनं हे सर्व आरोप फेटाळले आहेत. सेक्रेड गेम्सची अभिनेत्री आहे प्रेग्नन्ट, Water Birth द्वारे बाळाला देणार जन्म

जाहिरात

मात्र विशेष गोष्ट अशी की, रॉब कोहेनची मुलगी Valkyrie Weather हिने सुद्धा काही वर्षांपूर्वी त्याच्यावर छेडछाड केल्याचा आरोप केला होता. ज्यावेळी ती लहान होती त्यावेळी रॉब तिच्याशी छेडछाड करत असे. परदेशातील शूटिंग लोकेशन्सवर सेक्स वर्कर्सना भेटायला जाताना तो तिला घेऊन जात असे असं Valkyrie Weatherनं सांगितलं. कार्तिक आर्यनला ‘तिने’ केलं खुल्लमखुल्ला प्रपोज, VIDEO पाहून वाढलं साराचं टेन्शन रॉब कोहेन 2001 मध्ये रिलीज झालेलाहॉलिवुड सिनेमा फास्ट अँड द फ्यूरियस व्यतिरिक्त  2008 मध्ये आलेल्या ‘द ममी: टॉम्ब ऑफ द ड्रॅगन एम्परर’चं दिग्दर्शन केलं होतं. ========================================================= Navratri 2019: कोल्हापुराच्या अंबाबाईचं पहिलं दर्शन, पाहा LIVE VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या