JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / नक्कीच आता रितेशची खैर नाही, लग्नाच्या वाढदिवशी VIDEO शेअर करून बायकोशी घेतला पंगा

नक्कीच आता रितेशची खैर नाही, लग्नाच्या वाढदिवशी VIDEO शेअर करून बायकोशी घेतला पंगा

आज रितेश-जेनिलीयाचा लग्नाचा आठवा वाढदिवस आहे. त्यानिमित्त रितेशने मजेशीर व्हिडीओ ट्विट केला आहे. मात्र हा व्हिडीओ पाहून जेनेलिया काय रिअ‍ॅक्ट करेल ते मात्र सांगता येत नाही. पाहा हा व्हिडीओ नेमका काय आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 फेब्रुवारी : अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनिलिया देशमुख या स्टार कपलची ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या कायम पसंतीस पडत असते. सोशल मीडियावरही हे दोघेजणं आपलं प्रेम व्यक्त करत असतात. खासकरुन रितेश आपल्या लाडक्या ‘बायको’ बाबत सोशल मीडियावर नेहमीच काहीतरी शेअर करत असतो. मग लग्नाच्या वाढदिवशी रितेश कसा काय मागे राहील… तर आज रितेश-जेनेलीयाचा लग्नाचा आठवा वाढदिवस आहे. त्यानिमित्त रितेशने मजेशीर व्हिडीओ ट्विट केला आहे. मात्र हा व्हिडीओ पाहून जेनेलिया काय रिअ‍ॅक्ट करेल ते मात्र सांगता येत नाही. Happy Anniversary Baiko असं कॅप्शन देत रितेशने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये जेनेलिया अगदी प्रेमाने आपल्या लग्नाचे फोटो रितेशला दाखवतेय. मात्र त्यानंतर एखाद्या हतबल नवऱ्याप्रमाणे रितेशच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलतात. सगळ्यात मजेशीर बाब म्हणजे या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला असणारं गाणं. ‘जिन जख्मों को वक्त भर चला है, तुम क्यों उन्हे छेडे जा रहे हो’ हे गाणं रितेशने या व्हिडीओमध्ये वापरलं आहे. त्यामुळे जेव्हा जेनेलिया हा व्हिडीओ जेव्हा बघेल तेव्हा रितेशची काही खैर नाही एवढं मात्र खरं.

जेनेलियाने देखील त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या काही फोटो ट्विट केले आहेत. यामध्ये जेनेलियाने तुझे मेरी कसम या चित्रपटातील फोटोपासून त्यांच्या लग्नातील देखील फोटो अपलोड केला आहे. त्यामुळे रितेश-जेनेलियाच्या फॅन्सना फ्लॅशबॅकमध्ये गेल्यासारखं वाटेल.

काही दिवसांपूर्वी देखील रितेश-जेनेलिया तुझे मेरी कसम या सिनेमातील गाणं रिक्रेएट करत तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्या व्हिडीओलाही प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या