Happy Wedding Anniversary: बॉलिवूडमध्ये रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया डिसोझा (Genelia D’Souza) यांचे प्रेम लोकांसाठी एक उदाहरण बनले आहे.
मुंबई, बॉलीवूडचं क्युट कपल रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांच्या लग्नला आज 8 वर्ष पूर्ण झाली आहेत. दोघंही सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असतात. ते नेहमी त्यांचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांचे मजेदार व्हिडिओ चाहत्यांकडून खूपच पसंत केले जातात. फोटो साभार-@geneliad/Instagram
रितेश आणि जेनेलियाने अलीकडेच एका वीकेंड पार्टीचा मजेदार व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियात खूपच व्हायरल झाला होता. या व्हिडिओत दोघंही त्यांच्या इतर मित्रांसोबत झिंगाट गाण्यावर डान्स करताना दिसत होते. फोटो साभार-@geneliad/Instagram
बॉलीवूडचं हे क्युट कपल प्रेमाचं प्रतीक बनलं आहे. ते दोघं एकत्र असताना प्रत्येक क्षणाचा आनंद लुटत असतात. त्याचे फोटो आणि व्हिडिओज पाहिले तरी ही गोष्ट लक्षात येईल. फोटो साभार-@geneliad/Instagram
'तुझे मेरी कसम' या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा ओळख झाली होती. तेथूनचं त्यांच्या मैत्रीला आणि प्रेमाला सुरुवात झाली होती. हे बॉलीवूडमधील असं जोडपं आहे, ज्याचं इतर कोणत्याही बॉलीवूड कलाकारासोबत नाव जोडलं गेलं नाही. फोटो साभार-@geneliad/Instagram
'तेरे नाल लव हो गया' या चित्रपटाच्या माध्यमातून दोघांच्या प्रेमाची एक उत्कृष्ट केमिस्ट्री समोर आली होती. फोटो साभार-@geneliad/Instagram
रितेश आणि जेनेलियाने एकमेकांना दहा वर्षे डेट केल्यानंतर, 03 फेब्रुवारी 2012 मध्ये लग्न केलं होतं. आज या जोडीला दोन क्युट मुलही आहेत. फोटो साभार-@geneliad/Instagram
रितेश आणि जेनेलिया यांचा पहिला मुलगा रियानचा जन्म नोव्हेंबर 2014 मध्ये झाला होता. तर दोन वर्षांनी 2016 मध्ये त्याचा दुसरा मुलगा राहलचा जन्म झाला होता. रितेश नेहमी त्याच्या मुलांसोबत फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असतो. फोटो साभार-@geneliad/Instagram
रितेश देशमुख यापूर्वी 'बागी-3 ' या चित्रपटात झळकला होता. यावेळी त्याच्या अभिनयाचं कौतुक अनेकांनी केलं होतं. रितेश हा कॉमेडी चित्रपटांसाठी ओळखला जातो, पण बागी-3 मध्ये त्याने वेगळ्या धाटनीची भूमिका साकारली होती. फोटो साभार-@geneliad/Instagram