मुंबई, 30 एप्रिल : ज्येष्ठ अभिनेते, चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कपूर घराणाऱ्यातील एक पुष्प आज गळून पडले. अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचं आज निधन झालं. कालच अभिनेता इरफान खान याची वयाच्या अवघ्या 53 व्या वर्षी प्राणज्योत मालवली. सलग दोन चांगल्या कलाकारांच्या अशा एग्जिटमुळे जनतेमध्ये दु:खाचं वातावरण आहे. सध्या कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असल्याने अवघ्या 20 जणांच्या उपस्थितीत ऋषी कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी ऋषी कपूर यांचे पार्थिव रुग्णालयातून थेट स्मशानभूमीत घेऊन जावे अशी विनंती केली होती. त्यानुसार ऋषी कपूर यांचे पार्थिव घरी घेऊन जाण्यात येणार नसल्याची माहिती समोर येत आहे. तर थेट स्मशानभूमीत त्यांचं पार्थिक घेऊन जाण्यात येणार आहे. दुसरीकडे त्यांची मुलगी रिद्धिमा लॉकडाऊनमुळे दिल्लीत अडकली आहे. आपल्या वडिलांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी रिद्धिमाने सरकारकडे मुंबईला जाण्याची परवानगी मागितली आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांना मुवमेंटचा पास दिला असून त्या रस्त्याच्या मार्गाने मुंबईसाठी रवाना होणार आहेत. मुलगी आल्यानंतरच ऋषी कपूर यांच्या पार्शिवावर अत्यंसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. ऋषी कपूर यांना 2018 रोजी पहिल्यांदा कर्करोग असल्याचं समोर आलं. त्यानंतर जवळपास 8 महिने न्यूयॉर्कमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. याआधी ऋषी कपूर किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणीही या आजाराबाबत खुलासा केला नव्हता. नंतर त्यांनी स्वत: आपल्या फॅन्सना या आजाराबाबत माहिती दिली होती.ऋषी कपूर यांना कर्करोगाशी संबंधीत समस्या होती. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. रात्री उशिरा त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांना रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं होतं. 1970 सालच्या ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटी भूमिका करणाऱ्या ऋषी कपूर यांनी 1973 साली ‘बॉबी’ ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. गेल्या ४० वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका निभावल्या. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती. 90 च्या व 2000 च्या दशकात नायकाच्या भूमिका करणा-या ऋषी कपूर यांनी वाढत्या वयानुसार आपल्या भूमिकेत बदल केला. ‘कुछ तो है’ या सिनेमात ऋषी कपूर यांनी रंगविलेला सायको किलरनं खुर्चीला खिळवून ठेवलं. तर ‘अग्निपथ(नविन)’ मध्ये रौफ लालाची भूमिका चांगलीच गाजली होती. संबंधित - …आणि स्वत:च्याच लग्नात बेशुद्ध पडले ऋषी कपूर, नीतू यांनी सांगितला होता किस्सा